मुंबई:महाराष्ट्रातील राजकीय संकटात ( Maharashtra Political Crisis ) अखेर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रात्री उशीरा राजभवणावर पोचले ( Uddhav Thackeray reached Raj Bhavan ) ते स्वत: गाडी चालवत आले त्यांनी अवघ्या काही मिनीटांची राज्यपालांची भेट घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर ( submitted his resignation to the Governor ) केला.
उद्धव ठाकरे मातोश्री वरुन निघाल्याची माहिती मिळताच राज भवन परीसरात शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे समर्थक जमा झाले होते. ठाकरे यांनी राजीनाम्या पुर्वी सगळ्यांना जे सुरु आहे ते होऊद्या कोणालाही अडवु नका असे आवाहन केले होते. ते काही निवडक सहकारी आणि दोन्ही मुलांसह स्वत: गाडी चालवत राजभवनावर पोचलले. राज्यपालांशी त्यांनी काही मिनीटांची भेट घेतली आणि ते बाहेर पडले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयात आाव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. आणि उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निर्णय दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.