मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी ६ वाजता गोरेगावात सभा घेणार आहेत.
कीर्तिकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज गोरेगावात सभा - गोरेगाव सभा
शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सायंकाळी ६ वाजता गोरेगावात सभा घेणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
ठाकरे हे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. त्या अनुषंगानेच ते आज उत्तर-पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी गोरेगावात जाहीर सभा घेणार आहेत.
या सभेला शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपच्या आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, रिपाइं आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.