मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. मात्र या सुनावणीत निर्णय अपेक्षित होते. मात्र अद्याप केंद्रीय निवडणूक आयोगाने यावर निर्णय दिलेला नाही. त्यामुळे या महत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेतून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंधेरी पूर्व येथे झालेल्या पोट निवडणुकीआधी निवडणूक लढवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याची मागणी केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील तत्परतेने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठावले. त्यावर देखील उद्धव ठाकरे बेलण्याची शक्यता आहे.
नेते उपनेत्यांसोबत महत्त्वाची बैठक :पत्रकार परिषदेसह उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या नेत्यांची आणि उपनेत्यांची देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते आपल्या कार्यकर्त्यांना नेमका कोणता संदेश देणार आहेत हे गुलदसत्यात आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत या बैठकीतून नेत्यांना आणि उपनेत्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून काही महत्त्वाचे आदेश दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बैठकीबाबत देखील उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत बोलू शकतील. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे गटाने आपला उमेदवार उभा केला नाही या मुद्द्यावरून देखील उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या तत्परतेने शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह गोठवले ती सत्वता केंद्रीय निवडणूक आयोगा आता का दाखवत नाही असा सवाल पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारला जाण्याची शक्यता आहे.