महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thackeray Group Meeting : उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदार, खासदारांची बैठक! ठाकरे गटात अस्वस्थता कायम - Uddhav Thackeray organize a meeting

नुकताच निवडणूक आयोगाचा निर्णय आला असून शवसेना पक्ष आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गाटात मोठी अस्वस्थता आहे. दरम्यान, उरलेले खासदार आणि आमदारही काही वेगळा निर्णय घेतल की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मातोश्रीवर ठाकरे यांनी आपल्या गटातील खासदार आमदारांची बैठक बोलावली आहे.

Thackeray Group Meeting
Uddhav Thackeray

By

Published : Feb 18, 2023, 11:16 AM IST

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. तसेच, यानंतर आगामी निवडणुकीच्या तोंडावर पुढील रणनीती ठरण्यासाठी आमदार आणि खासदारांची उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार असून, यात काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खासदार आणि पदाधिकारी टिकवण्याची कसरत : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरे यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह यावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. शिवाय पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकारी टिकून ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आमदार आणि खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीबाबत रणनीती आजच्या बैठकीत ठरवली जाणार आहे.

देशातील जनतेने या दडपशाही विरोधात आवाज उठवावा : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आयोगावर सडकून टीका केली आहे. आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. आज निर्णय द्यायचा होता, तर सुरुवातीलाच का दिला नाही. प्रमाणपत्र गोळा करण्याच्या नावाखाली एवढे दिवस कशासाठी घालवले. निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणूक निर्णय देऊन शेण खाल्ला आहे, अशा शब्दांत जोरदार हल्लाबोल चढवला. महाराष्ट्रातील जनतेचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, शिवसैनिकांनी खचून जाऊ नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केला. देशातील जनतेने या दडपशाही विरोधात आवाज उठवायला हवा, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेतून बाहेर पडलेले सगळे लोक चोर : देशात राज्यघटनेनुसार कायदा चालतो. निवडणूक आयोगाचा निर्णय मिरीटवरून दिलेला आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. शिवसेना हे नाव आणि चिन्ह आम्हाला मिळाले, खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे. हा विजय आमच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आणि लोकशाहीचा आहे. आम्ही संघर्ष केला त्या विजयाचे हे प्रतीक आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले सगळे लोक चोर असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेवरही एकनाथ शिंदे यांनी टीका करताना जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

हेही वाचा :Amit Shah Pune Visit : अमित शाह यांची नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट

ABOUT THE AUTHOR

...view details