महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सगळी शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला-खांदा लावून शेतात उतरली पाहिजे - उद्धव ठाकरे - farmer problem

सरकार शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करते. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहचत नाही. झारीतील शुक्राचार्य हे लाभ अडवून ठेवतात. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या या शुक्राचाऱ्यांना शोधून काढण्याचे काम शिवसेनेचे आहे.

उद्धव ठाकरे

By

Published : Jun 26, 2019, 9:34 PM IST

मुंबई- निवडणुका येतात आणि जातात, फक्त निवडणुका आहेत म्हणुन मुद्दे घ्यायचे, असे अजिबात नाही. 'वन नेशन वन इलेक्शन होईल तेव्हा होईल' पण आत्ता शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करा, त्यांच्या अडचणी सोडवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेने चारा छावणीनंतर मदत मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शिवसेना मंत्री, आमदार, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बुधवारी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक पार पडली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

सरकार शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करते. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत त्याचे लाभ पोहचत नाही. झारीतील शुक्राचार्य हे लाभ अडवून ठेवतात. शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या या शुक्राचाऱ्यांना शोधून काढण्याचे काम शिवसेनेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय शिवसेना देणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फक्त घोषणा म्हणजे वचनपूर्ती नसून जी घोषणा झालेली आहे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला खात्री आहे की, तुम्ही कामे करुन दाखवणार आहात. शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन नुसते चहा पिऊ नका तर अडले-नडलेले प्रश्न विचारून ते मार्गी लावा. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, यातील वाघ काय असतो हे शेतकऱ्यांना नडणाऱ्या माणसांना दाखवून द्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्री आमदार आणि जिल्हा प्रमुखांना दिले.

माझ्यासाठी विश्वास हाच आशीर्वाद आहे. आशीर्वाद हा कमवावा लागतो हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य आहे. जनतेला माहीत आहे संकट आले तर शिवसैनिक मदतीला धावून येईल. निवडणुका येथील निवडणुका जातील, निवडणूक आहे म्हणून मुद्दे घ्यायचे असे नाही. मी टीकेची पर्वा करत नाही. माझे मन प्रामाणिक आहे. लोकांना आपला प्रामाणिकपणा भावला म्हणून लोकांनी भरभरून मतदान केले, हाच विश्वास कमवायचा आहे, असे उद्धव ठाकरेंनी उपस्थितीत शिवसैनिकांना म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details