मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. राज्यातील सरकार सध्यातरी स्थिर आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल ते निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे राजकारणी सत्तेसाठी हपापले होते त्यांची चिरफाड केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकशाहीची रक्षा करणे आपले काम आहे. मी राजीनामा दिला नसता तर मी मुख्यमंत्री बनलो असतो, असे आज सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे. परंतु, माझी लढाई जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. आज राजकारणात वाद होत राहतात. परंतु, आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायचे आहे. आम्ही सगळे मिळून देशाला गुलाम बणवणाऱ्यांना घरी पाठवणार आहोत - उद्धव ठाकरे
अध्यक्षांच्या हातात 16 आमदारांच्या नाड्या : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकालाचे सर्वोच्च न्यायालयात वाचन करण्यात आले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, त्याचबरोबर शिंदे गटावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सोबतच 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याने तो निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे देखील सांगितले. त्यामुळे आता शिंदे गटाच्या 16 आमदारांचे भविष्य विधानसभा अध्यक्षांच्या हातात असणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे : यावेळी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "न्यायालयाने ज्या काही नोंदी नोंदवलेले आहेत त्या अतिशय महत्त्वाचे आहेत. संपूर्ण देशाला या निकालाची उत्सुकता होती. राज्यपालांनी जे काही त्यावेळी केले हे संपूर्ण पणे घटनाबाह्य होते. राज्यपालांच्या अधिकाराखाली नव्हते. हे आता न्यायालयाने देखील नमूद केला आहे. अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवर जरी सोपवला तरी पक्षादेश हा माझ्या शिवसेनेकडेच राहील. सत्यासाठी हापापलेल्या लोकांचे न्यायालयाने आज धिंडवडे काढले आणि राज्यपालांच्या बाबतीत वस्त्रहरण झाले आहे.
नैतिकतेच्या मूल्यावर राजीनामा दिला : "आपल्या निकाल वाचनात सरन्यायाधीशांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांच्या सरकार पुन्हा आणू शकलो असतो असे म्हटले. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन चुकी केली अशी याआधी प्रतिक्रिया दिली होती. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी राजीनामा नसता दिला तर मी मुख्यमंत्री पुन्हा झालो असतो. पण मी माझ्यासाठी नाही लढाई आहे. मी देशासाठी लढत आहे. हे लोक देशाला पुन्हा गुलाम बनवू पाहत आहेत. माझा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे तो योग्य की अयोग्य हा कायद्याच्या बाबतीत न बसवता मी दिला. माझा राजीनामा हा नैतिकतेच्या मूल्यांवर मी दिला. ज्यांना माझ्या पक्षाने सर्व दिले त्या लोकांनी असे केले. सर्व देवून सुद्धा माझ्या पाठीत वार केला. विश्वासघात करुन माझ्यावर अविश्वास आणणे हे मला पटले नव्हते. म्हणून मी राजीनामा दिला."
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांचा मागितला राजीनामा : आता 16 आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "सर्वोच्च न्यालयाने त्या संस्थेचा आदर राखण्यासाठी त्यांच्याकडे दिला आहे. पण शेवटी पक्षादेश माझ्या शिवसेनाचा लागू होणार आहे. सर्वोच न्यायालयाने फटके दिल्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेवर राजीनामा द्यायला हवा. आता राज्यपालांनी जे करायचे ते केले पण त्यांना शिक्षा काय? निवडणूक आयोगाने त्यांचे काम यांनी चौकटीत केले पाहिजे. निवडणूक आयोग हे निवडणुकीपर्यंत मर्यादित असते. निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नाही.
हेही वाचा -
- SC on Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरेंचा राजीमाना शिंदे-फडणवीसांचा विनर पाईंट
- Sanjay Raut Reaction: नैतिकतेच्या मुद्द्यावर शिंदे सरकारने राजीनामा द्यावा- संजय राऊत
- Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाने राज्यापालांसह निवडणूक आयोगाला फटकारले, शिंदे-फडणवीस सरकार वाचले!