मुंबई -पद आणि जबाबदारी समान वाटण्याचे ठरले होते. तेच भाजपकडून होणे अपेक्षित आहे. जे ठरले आहे त्याच्या सुईच्या टोकापेक्षा अधिक नको, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले. आज गुरुवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कोणताही प्रस्ताव भाजपकडून अद्याप आलेला नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्याशी नेहमी बोलणे होत असते. मात्र, भाजपने कोणताही प्रस्ताव शिवसेनेकडे मांडलेला नाही, असे ठाकरे म्हणाले. सर्व शिवसैनिक कठीण परिस्थितीत निवडून आले. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना आमदारांचे अभिनंदन केले. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना बुंदी लाडूंच्या वाटप केले.