महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray News : धर्माच्या नावावर मत मागणं योग्य आहे का? उद्धव ठाकरे यांच निवडणूक आयोगाला पत्र - उद्धव ठाकरे मुंबई पत्रकार परिषद

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या कथित पक्षपातीपणाबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या नावावर मत मागून देखील कारवाई केली नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 1:38 PM IST

Updated : Nov 16, 2023, 3:05 PM IST

उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई : 1981 मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं निवडणूक लढविली होती. तेव्हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. मंदिर वही बनायेंगचा नारा दिल्यानं निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या पाच ते सहा आमदारांवर कारवाई केली होती. हिंदुत्वाचा प्रचार केल्यानं निवडणूक आयोगानं कारवाई केली होती. मग, आता निवडणूक आयोगाकडून अशी कारवाई का होत नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. ते मुंबईमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

निवडणूक आयोगावर टीका : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक लढविण्याबाबत व मतदान करण्यासाठी बाळासाहे ठाकरे यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात आली होती. बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढला होता, हे योग्य आहे का? निवडणूक आयोगाने काही बदल केले असेल तर कळविणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकमध्ये बजरंगबली म्हणून मतदान करण्याचे आवाहन केले. मध्य प्रदेशमधील निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रामल्लाचे दर्शन फुकट देऊ असे जाहीर केले. निवडणूक आयोगानं नियम शिथील केला का? हे स्पष्ट करावं. बदल केल्याचे आम्हाला कळवावे. आमच्याकडूनही जय भवानी म्हणून मतदान करा, असे मतदारांना आवाहन करण्यात येईल.

सर्व रामभक्तांना फुकट रामल्लाचं दर्शन व्हावे-पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचे गृहमंत्र्यांना आवाहन आहे की, तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व रामभक्तांसाठी सोय करावी. २२ जानेवारीला राममंदिराचे उद्घाटन आहे, तेव्हा ५ ते सहा कोटी नागरिकांना नेण्यात येणार आहे. तेव्हा रामभक्तांना फुकट आणले, असा भाजपाकडून प्रचार होईल. मात्र, सर्व रामभक्तांना फुकट रामल्लाचं दर्शन व्हावे, असे ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरेंबाबत घेतलेला निर्णय योग्य होता का, हे निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं. निवडणूक आयोगानं बदल कधी, केव्हा व कसा केला हे कळण्यासाठी निवडणूक आयोगाला आज सकाळी पत्र लिहिले आहे.

आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हिशोब करू-निवडणूक आयोगानं राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, प्रियंका गांधी यांनाही नोटीस पाठविली आहे. निवडणूक आयोगाचं चुकीच आहे, असं म्हणणं नाही. तर निवडणूक आयोग जागरुक आहे. मात्र, निवडणूक आयोगानं बदललेल्या आचारसंहितेच्या नियबाबाबत अवगत करावे. धर्माच्या नावावर मत मागणे योग्य आहे का? ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना नाशिक पोलिसांनी अट केली आहे. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचा पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हिशोब करणार आहोत.

हेही वाचा-

  1. Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मुंब्र्यात येण्यापूर्वीच 'पेटलं रान' ; अज्ञात कार्यकर्त्यांनी फाडले स्वागताचे बॅनर
  2. Maratha Reservation : 'फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला'
Last Updated : Nov 16, 2023, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details