महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​Gajanan Kirtikar -उद्धव ठाकरेंचे विचार संकुचित, खासदार गजानन कीर्तिकरांचे अनेक गंभीर आरोप

खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. किर्तीकर म्हणाले की, गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत मी आहे. पक्षाचा निष्ठावंत होतो. तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मालाड विधानसभा मतदारसंघात माझ्याऐवजी एक उत्तर भारतीयाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केला. (Uddhav Thackeray narrow minded person)

खासदार गजानन कीर्तिकरांचा गंभीर आरोप
खासदार गजानन कीर्तिकरांचा गंभीर आरोप

By

Published : Nov 12, 2022, 12:52 PM IST

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात गेलेल्या खासदार गजानन कीर्तिकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे 2004 पासून माझे तिकीट कापण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी ते होऊ दिले नाही, असा हल्लाबोल किर्तीकर यांनी केला. यावेळी पक्षप्रमुखांचे विचार संकुचित असल्याचेही किर्तीकर (Uddhav Thackeray narrow minded person) म्हणाले.


​​
उत्तर भारतीयाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न -शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची स्पर्धा सुरू आहे. आता खासदार गजानन किर्तीकर यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. किर्तीकर म्हणाले की, गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत मी आहे. पक्षाचा निष्ठावंत होतो. तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मालाड विधानसभा मतदारसंघात माझ्याऐवजी एक उत्तर भारतीय बिल्डर व्ही. के. सिंग याचा भाऊ रमेश सिंग याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केला.



मोठा पक्षप्रमुख, विचार संकुचित ​- आजवर मला चार वेळा आमदारकीचे तिकीट मिळाले. चौथ्यांदा उद्धव ठाकरे माझे तिकीट कापत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमदेवारी द्यायला लावली. २००९ मध्येही निवडणुकीचे तिकीट दिले नाही. माझा पीए सुनील प्रभूला उद्धव ठाकरेंनी तिकीट देत, मला डावलले. आजवर आम्ही तोंड दाबून लाथाबुक्क्यांचा मार सहन केला, अपमान पचवला. पण शिवसेना सोडली नाही. २०१९ मध्ये एनडीएमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रिपद आले. ते मंत्रिपद उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना दिले. अशावेळी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मर्जीतील माणसे आठवतात. गजानन किर्तीकर यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आठवला नाही, अशी टीका केली. एवढा मोठा पक्षप्रमुख पण अशा पद्धतीने विचार करायचा, असा एकेरी उल्लेखही गजानन किर्तीकर यांनी करत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details