महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट - maharashtra goverment forming

महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

uddhav thackeray meet governor
उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Nov 27, 2019, 9:39 AM IST

Updated : Nov 27, 2019, 9:51 AM IST

मुंबई -महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.यावेळी राज्यपालांनी बाहेर येऊन उध्दव ठाकरेंचे स्वागत केले.

हेही वाचा -'मातोश्री' ते 'वर्षा' ; ठाकरेंचा किंगमेकर ते किंगपर्यंतचा प्रवास

महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शपथविधीच्या अगोदर ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्यासह राजभवनात जावून राज्यपालांची भेट घेतली.

Last Updated : Nov 27, 2019, 9:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details