मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच राज्यातील सर्व नागरी भागात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ नये. आज रात्रीपासून राज्यात येणारी सर्व विमानांची सेवा बंद करण्यात आली आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करुन फक्त ५ टक्केच कर्माचारी काम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
महाराष्ट्र लॉकडाऊन..! कलम १४४ लागू, ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद - नागरी भागात कलम १४४ लागू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच राज्यातील सर्व नागरी भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
जे लोक परदेशातून आले आहेत, त्यांनी एकटे राहावे. त्या लोकांच्या संपर्कात कोणाही जाऊ नये असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. आज रात्रीपासून मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. फक्त जीवनावश्यक वस्तुंची ने आण करण्यासाठी शहरातील बससेवा चालू राहणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहे. त्यांच्या हातावर शिक्के आहेत, अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. तसेच आम्ही राज्यातील चाचणी केंद्र आणखी वाढवीत आहोत. गरज पडल्यास ३१ मार्चच्या पुढेही अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी मंदीरे बंद आहेत. अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटात ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कामगारांना किमान वेतन द्यावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.