मुंबई - उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्त ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालय प्रवेशद्वारावर फुलांची सजावट करण्यात आली. तसेच शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.
विधानभवनात उद्धव ठाकरेंची मंत्र्यांसोबत बैठक;आज विश्वासमत ठराव मांडणार - uddhav thackarey press conference
उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला. उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Live Update -
- 05.30 - विधानभवनात उद्धव ठाकरेंची मंत्र्यांसोबत बैठक सुरू
- 05.13 - उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा'वर जाण्याचे दिले संकेत
- 05.10 - 'आरे' कारशेडला स्थगिती; 'आरे' मधील एकाही झाडाच्या पानाला हात लागू देणार नाही
- 05.08 - जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबली पाहिजे; आपण जनतेला उत्तरदायी - मुख्यमंत्री
- 05.06 - पत्रकारांनी सरकारला जनतेचा प्रतिसाद कळवावा; सरकारचे नाक, कान, डोळे व्हावे - ठाकरे
- 05.01 - पत्रकारांकडून 'मार्मिक' चा अंक भेट
- 05.00 - उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू; पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप
- 03.40 - दिलीप वळसे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
- 3:20 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्य सचिवांसोबत बैठक
- 2.55 - महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी २ वाजता विश्वासमत ठराव विधानसभेत मांडणार
- 2.26 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वीकारला पदभार
- 2:12 - उद्धव ठाकरे यांचे मंत्रालयातील कर्मचारी महिलांनी औक्षण केले
- 2:05 - मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ठाकरे यांनी अभिवादन केले
- 2:02 - मंत्री बाळासाहेब थोरात, अब्दुल सत्तार, मंत्री नितीन राऊत, मंत्री जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे हेही मंत्रालयात पोहोचले
- 1:55 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले.
- 1:50 - हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री आता मंत्रालयाकडे रवाना झाले
- 1:43 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येण्यापूर्वी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले.
- 1:06 - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालय प्रवेशद्वारावर फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार आणि मंत्री स्वागतासाठी प्रवेशद्वारावर दाखल.
- 1:05 - मंत्री जयंत पाटील यांचे मंत्रालयात आगमन
- 12:55 मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
- 12:55 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मंत्रालय प्रवेशद्वारावर अधिकारी उपस्थित
- 12:42 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात अभिवादनासाठी येणार असल्याने नागरिकांची गर्दी
- 12:31 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात येण्यापूर्वी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात
- 12:54 मंत्रालयासमोरील मादाम कामा रोड भगव्या ध्वजांनी सजला
Last Updated : Nov 29, 2019, 11:50 PM IST