मुंबई : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने ( Agricultural damage due to return rains ) धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं कापणीला आलेले पीक वाया गेल ( Due to rain, harvested crops farmers were wasted ) आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती आल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू शकतात असं म्हटले जातय. या परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ( Party chief Uddhav Thackeray ) औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याबाबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
Aaditya Thackeray : ....म्हणून आता स्वतः उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार - आदित्य ठाकरे - Uddhav Thackeray himself
नुकसानग्रस्त भागाची पहानr राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ( Party chief Uddhav Thackeray ) औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याबाबत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केली - यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "परतीच्या पावसामुळे राज्यात फारच वाईट परिस्थिती झाली आहे. एका बाजूला दिवाळी आहे तर दुसऱ्या बाजूला परतीच्या पावसाने केलेला नुकसान. आम्ही राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकावर बसलो. त्यावेळी देखील आम्ही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत होतो. शेतकऱ्यांना मदत जाहीर करा अशी आम्ही मागणी केली. त्याच्यासाठी आम्ही विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसलो. आंदोलन केली. मात्र, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत या खोके सरकारला कोणतीही सहानुभूती नाही. आता परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे सरकारने आता तरी जागे होऊन या शेतकऱ्यांसाठी ठोस पावल उचलावीत आणि तातडीने मदत जाहीर करावी." असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर -पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आम्ही जेव्हा सत्तेत होतो त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती. त्यांच्या खात्यावर आम्ही पैसे देखील टाकले होते. आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल त्या दृष्टीने योजना आखत होतो. मात्र, हे या खोके सरकारला पाठवलं नाही. आता मराठवाड्यात जी काही परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे स्वतः औरंगाबादला जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतील. यावेळी ते मराठवाडा दौरा देखील करतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आम्ही सातत्याने मुद्दे पुढे मांडत आलो आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यातून आम्ही ते मुद्दे आता आणखी प्रकर्षाने मांडू." असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.