महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

७ मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार - संजय राऊत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तेथे ते रामलल्लाचे दर्शन घेऊन, शरयू  आरतीही करणार असल्याचे राऊत म्हणाले.

sanjay raut
संजय राऊत

By

Published : Jan 25, 2020, 11:35 AM IST

Updated : Jan 25, 2020, 11:55 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ७ मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तेथे ते रामलल्लाचे दर्शन घेऊन, शरयू आरतीही करणार असल्याचे राऊत म्हणाले. तसेच राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचे राऊत म्हणाले.

संजय राऊत

यात कोणीही राजकारण करु नये

राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकारण होऊ नये, कोणी राजकीय दृष्टीने पाहू नये असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाताना काँग्रेस खासदार राहुल गांधींनाही घेऊन जावे असे भाजपने म्हटले होते, यावर संजय राऊत म्हणाले की, भाजप मेहबूब मुफ्तिला घेऊन जाणार होते का? असा सवाल त्यांनी केला. राम मंदिरासंदर्भात सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. हे भाजपच्या नजरेतून सुटल्याचे राऊत म्हणाले.

भाजपच्या वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज नाही

भाजपच्या प्रत्येक वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Jan 25, 2020, 11:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details