महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thackeray Group Vs BJP : दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आधार- सामनातून भाजपवर टीका - सामना कर्नाटक दंगल अग्रलेख

अमित शाह यांनी आपण कर्नाटकात सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण रद्द करू असे विधान केले. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे. याचे पडसाद महाराष्ट्र देखील उमटायला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकीयमधून यावर टीका करण्यात आली आहे.

Thackeray Group Vs BJ
ठाकरे गटाची अमित शाह यांच्यावर टीका

By

Published : Apr 27, 2023, 10:41 AM IST

मुंबई -कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपल्या संपूर्ण ताकतीनिशी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. प्रत्येक पक्ष आपला अजेंडा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सातत्याने या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अशाच एका सभेला संबोधित करताना वादग्रस्त विधान केल्यानंतर सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

कर्नाटकात दंगलीचे भूत-निवडणुकीच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह भाजपच्या स्टार प्रचारकांची संपूर्ण फौजच कर्नाटकात आहे. मागची पाच वर्षे कर्नाटकात बोम्मई यांच्या नेतृत्वातील भाजपचे सरकार असताना देखील कर्नाटकात विकासावर मते न मागता हिंदू मुस्लिम जातीय दंगलीवर मत मागितली जात आहेत. असा आरोप सामानातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपकडून घराणेशाहीचा मुद्दा देखील भाजपकडून प्रचारात आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला विकासावर मत मागा असा सल्ला देणारे स्वतः मात्र दंगलीचे भूत नाचवत आहेत, अशी टीका देखील दैनिक सामनातून करण्यात आली आहे.


जनताच भांडाफोड करेलदेशातील जातीय, धार्मिक दंगलीवरून सामनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. सामानात म्हटले, की प्रत्येक मुद्द्यावरून धार्मिक उन्माद वाढविण्याचा व दंगली भडकविण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. त्यांना सगळीकडे दंगलीच का दिसत आहेत, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यासा दंगली याच भाजपच्या राजकारण आणि सत्ताकारणाचा आधार बनल्याने गृहमंत्र्यांनी कर्नाटकात तसा इशारा दिला आहे. हा प्रश्न त्यांच्या नगाऱ्याचा नसून देशातील जातीय, धार्मिक शांतता आणि सलोख्याचा आहे. भाजप विद्वेषी राजकारणाचा भंडाफोड कर्नाटकातील जनता करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुतील प्रचाराचे पडसाद सध्या महाराष्ट्रात उमटत आहेत. महाराष्ट्रात देखील निवडणुका केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे याचे परिणाम इथल्या निवडणुकांमध्ये दिसणार का? महाराष्ट्रात प्रचाराचे मुद्दे काय असतील? हे पाहणे महत्वाचे आहे.

हेही वाचा-Amit Shah Nagpur Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आजचा नागपूर दौरा रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details