मुंबई- जगाला विळखा घातलेल्या कोरणा विषाणूच्या प्रादुर्भावाशी प्रशासन लढा देत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्तपदी विजय सिंघल व नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केल्या सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, ठाणे मनपा आयुक्तपदी विजय सिंघल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आणखी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्तपदी विजय सिंघल व नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकीय बदल्या खालील प्रमाणे-
1. रणजित कुमार- संचालक, माहिती तंत्रज्ञान मुंबई
2. एमजी अर्दड- आयुक्त, मृद व जलसंधारण औरंगाबाद
3. विजय सिंघल- महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे
4. एल. एस माळी - उपसचिव, ग्रामविकास विभाग, मुंबई
5. अभिजीत बांगर - (आदेशामध्ये अंशतः बदल करुन) अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नागपूर
6. यु. ए. जाधव - (आदेशामध्ये अंशतः बदल करुन) उपसचिव, ग्रामविकास विभाग मुंबई
7. मदन नागरगोजे - सहसचिव, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई