मुंबई : देशात लोकशाही धोक्यात आली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल रिंगणात उतरले आहेत. त्यासाठी व्यासपीठ उभारले असून सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा,असे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमीकेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कपिल सिब्बल यांचा निर्णय स्वागतार्ह असून त्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोकशाही मूल्यांना धोका :देशात भाजप सत्तेवर आल्यापासून लोकशाही मूल्यांना धोका निर्माण झाला आहे. सरकार विरोधात आवाज उठवला तर, कारवाई होते, तुरुंगात डांबले जाते. संविधानाऐवजी देश धर्मावर चालत आहे. एकूणच लोकशाहीकडून गुलामगिरीकडे आपण चाललो आहोत. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी देशातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे. ११ मार्चपासून राष्ट्रीय मोहीम राबवली जाणार आहे. जंतन-मंतर मैदानातून या मोहिमेला सुरुवात होईल. लोकांनमध्ये यातून जनजागृती करण्याचा उद्देश आहे. मोदींना विरोध नव्हे, तर लोकशाही मूल्य जपण्यासाठी सुधारण्याचा आमचा मानस आहे, असे ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेमुळे देशात एकता :काँग्रेसचे नेते राहुल गांधी सर्व घटकातील समाज बांधवांना एकत्र आणत आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशात एकता किती महत्त्वाची आहे, त्याची जाणीव करून दिली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुधारण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षाने यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी या आवाहनाला पूर्ण पाठिंबा दिला.