महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray criticism Shinde Govt: शेकडोंचा जीव जाऊनही सरकार ढिम्म; बुलडाणा अपघातावरून उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले

बुलडाणा येथील समृद्धी महामार्गावर बसला अपघात होऊन 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Buldana district Samriddhi highway accident) ही घटना दुर्दैवी असून मन हेलावून टाकणारी आहे. मागील वर्षभरात महामार्गावर तीनशेहून अधिक प्रवाशी दगावले. सरकार ढिम्म असल्याने आजवर कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Buldana Bus Accident) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले. (Uddhav Thackeray criticism Shinde Govt) बुलडाणाच्या घटनेतून सरकारने डोळे उघडावेत, असा सल्लाही यावेळी दिला.

Uddhav Thackeray criticism Shinde Govt
उद्धव ठाकरे

By

Published : Jul 1, 2023, 4:56 PM IST

मुंबई :नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा बुलडाण्यातील सिंदखेडजवळ शनिवारी पहाटे अपघात झाला. (Buldana district Samriddhi highway accident) या अपघातात बसने पेट घेतल्याने 25 प्रवासी होरपळले. (Buldana Bus Accident) राज्यात या घटनेने काळीज पिळवटून टाकले आहे. आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाच्या मदतीची घोषणा केली. तर जखमींवर विनामूल्य उपचाराचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अपघाताच्या घटनेवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Uddhav Thackeray criticism Shinde Govt) तसेच घटनास्थळी जाऊन या अपघाताची पाहणी करणार असल्याचे सांगितले.

अपघात प्रकरणी शरद पवारांचे ट्विट:या अपघातावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांकडे लक्ष वेधण्यास सरकार कवी पडल्याचे ट्विट केले. यानंतर उद्धव ठाकरेंनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

उद्धव ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली:उद्धव ठाकरे म्हणाले की, बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसचा भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना उद्धव ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली.

जीवितहानी टाळू शकलो नाही: यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले; पण दुर्दैवाने जीवितहानी टाळू शकलो नाही. समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजिक पिंपळखुटा फाट्याजवळ आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला होता. दरम्यान 25 जणांचे मृतदेह 5 एम्बुलन्सद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा:

  1. Bus Accident in Buldhana : बुलडाणा बस अपघातात 26 जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण आले समोर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट
  2. Buldhana Bus Accident : बुलडाणा बस अपघातस्थळाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली भेट; जखमींची केली विचारपूस
  3. Bus Accident in Buldhana : बसच्या फिटनेससोबतच प्रवाशांच्या सुरक्षेकडेही दुर्लक्ष; गमवावा लागला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details