मुंबई :मुंबई महापालिका घोटाळ्यावरून निशाणा साधला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी पीएम केअर फंड घोटाळ्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच सवाल केला आहे. कोविड काळात राज्य सरकार अडचणीत असताना, भाजपच्या लोकप्रतिनिधींनी निधी पीएम केअर फंडात वळवला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपची फिरकी घेत, हास्य जत्रेतील प्रभाकर मोरे फंडाचा निधी गेला कुठे? अशा प्रश्नांची सरबत्ती केली. छत्रपती शिवाजी मंदिर येथे पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. दरम्यान, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना गर्भित इशारा दिला.
कोविड घोटाळ्याची ईडीकडून चौकशी :मुंबई मनपातील कोविड घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची याप्रकरणी झाडाझडती घेण्यात आली. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावरुन जोरदार घणाघात केला आहे. कोविड घोटाळा आणि पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी 1 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले.
पीएम नीधीचे पैसे गेले कुठे? :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेला पीएम केअर फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही का? या फंडात भाजपच्या दलालांनी निधी दिला. महाराष्ट्र अडचणीत असताना, थेट निधी वळता केला. आता जाब विचारत आहेत. भाजपने पीएमचा अर्थ काय? हे सांगावे. अन्यथा हास्यजत्रेतील प्रभाकर मोरे केअर फंड. अगं शालू… माहीत आहे ना, अस सांगत ठाकेर यांनी पीएम नीधीची जोरदार खिल्ली उडवली. भाजपच्या दलालांनी, लोकप्रतिनिधींनी प्रभाकर मोरे केअर फंडला दिलेले पैसे गेले कुठे? असा सवाल विचारला.
तुमच्या घोटाळ्याची चौकशी कोण करणार : कोविड काळात महाराष्ट्र संकटात होता. व्हेंटिलेटरची कमतराता होती. ते कोणी विकत घेतले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेमडीसीवीरच्या खरेदीसाठी समिती नेमली. समितीने निविदा न मागवता खरेदीला परवानगी दिली. दक्षिणेत एजन्सी नेमली. त्यातून खरेदी विक्री संघ निवडण्यात आला. त्या समितीने खरेदी केली. आमच्याकडे काहीच नव्हते. तुम्ही अजूनही आमची चौकशी करत असाल तर, तुमच्या घोटाळ्याची चौकशी कोण करणार आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपशासित राज्यांना मदत ?: मनसुख मांडविया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझे कौतुक केले. मांडवियाला आता रेमडेसिव्हिरबद्दल विचारायचे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात किती उपाययोजना केल्या जातात? इतर राज्यांना किती छुप्या पद्धतीने मदत केली जाते. भाजपशासित राज्यांना किती मदत दिली? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरेंची मोदींवर टीका :छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. आता भाजपचे दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचे जगात तोंडभरून कौतुक झाले. पण या नालायकांना त्याचे कौतुक नाही, असे टीकास्त्र ठाकरेंनी सोडले. तसेच, बराक ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्दल बोलले होते. आता कुठे गेला माय डिअर बराक…? आता बराक बराच बोलतोय, असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला. आता टीका होऊ लागल्याने आंतरराष्ट्रीय जागतिक मोदींना बदनाम करायचा कट आहे. मोदी विरुद्ध जग, असा सामना रंगला आहे. मात्र, इकडे उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप आहे. त्याचे काय? असे ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -Uddhav Thackeray : आम्ही कोणाच्या घरावर जात नाही, फडणवीसांनी आपले घर सांभाळावे- उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा