महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : ट्विटर हँडल हॅक झाले, तर पंधरा दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री गप्प का - उद्धव ठाकरे

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी 17 तारखेच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका (Uddhav Thackeray criticized Karnataka CM ) केली. काल गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रकरणात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट हे त्यांनी केले नसून, ट्विटर हँडल हॅक (CM Basavaraj Bommai on Twitter handle hack) झाले, असे सांगण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हँडल हॅक होऊन 15 ते 20 दिवसानंतर देखील त्यांचे मुख्यमंत्री कार्यालय जागरूक नाही का? असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Dec 16, 2022, 8:20 AM IST

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे

मुंबई :17 तारखेच्या महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर टीका केली. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मात्र ही बैठक झाल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट हे त्यांनी केले नसून, त्यांचे ट्विटर हँडल हॅक झाले होते, असे स्पष्टीकरण देण्यात (Uddhav Thackeray on Twitter handle hack) आले.

ट्विटर हँडल हॅक :मात्र ट्विटर हँडल हॅक झाला असले तरी, सीमा भागामध्ये मराठी माणसांवर पोलीसांनी केलेला लाठीचार्ज, महाराष्ट्रातून गेलेली वाहनांची तोडफोड हे सर्व तेथे घडले आहे. हा सर्व प्रकार गेले पंधरा दिवसापासून सीमा भागात सुरू आहे. पण काल गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर ट्विटर हँडल हॅक (CM Basavaraj Bommai on Twitter handle hack) झाले, असे सांगण्यात आले. मग पंधरा दिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री गप्प का बसले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हँडल हॅक होऊन 15 ते 20 दिवसानंतर देखील त्यांचे मुख्यमंत्री कार्यालय जागरूक नाही का? असा मुद्दाही उपस्थित (Uddhav Thackeray criticized Karnataka CM) केला.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद :कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद नेहमीच कर्नाटक राज्यातून केला गेला आहे. नेहमीच आवाज चिडवण्याचा प्रयत्न कर्नाटक राज्याने केला आहे. महाराष्ट्राने कधीही याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केलेली नाहीत. अनेक वेळा ज्या वेळेस हा वाद होतो. महाराष्ट्राने कधीही याबाबत वादग्रस्त भूमिका घेतली नाही. मात्र नेहमीच महाराष्ट्राने संयम दाखवावा का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच काल झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ गृहमंत्र्यांच्या 'हा'ला'हा' म्हटले आहे. आपली कोणतीही भूमिका मांडलेली नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विटर हँडल हॅक होणे, असे कारण देणे म्हणजे महाराष्ट्राच्या जखमेवर अजून मीठ चोळले गेले. असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले (Karnataka Maharashtra Borderism) आहे.



सरकारला महाराष्ट्र प्रेमी :महापुरुषांवर केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये, सीमा भागाचा मुद्दा या सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्ष रस्त्यावर उतरत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे हे मुद्दे आहेत. तसेच महाराष्ट्र प्रेमी म्हणून विरोधक 17 डिसेंबरला मोर्चा काढत आहे. मात्र ते महाराष्ट्र प्रेम राज्य सरकारमध्ये कुठेही दिसत नाही. महाराष्ट्राच्या मुद्द्यावर राज्य सरकार आक्रमक नाही. त्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र प्रेमी म्हणायचं का? असा सवाल ही पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी मांडला.

ABOUT THE AUTHOR

...view details