महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray On BJP : राज्यात शिल्पकार पळण्याचे प्रकार, बंडखोरीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थिबद्दल उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. सगळ्यांनाच आत्ता मुख्यमंत्री व्हायचे आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर केली आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

By

Published : Jul 6, 2023, 8:47 PM IST

मुंबई :सत्ता येते सत्ता जाते मात्र, माणुस म्हणून तुमची ओळख टिकली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, माझा पक्ष प्रमुख म्हणून उल्लेख केला त्याबद्दल मी धन्यावद देतो. कोणीतरी आहे, मला पक्ष प्रमुख म्हणून मानणारे. नाही तर, देवेंद्रजी मला असे, वाटले उद्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर महाराष्ट्रला पुन्हा नविन एक मुख्यमंत्री मिळाला अशी बातमी येते की काय? मात्र, नंतर लक्षात आले देवेंद्र अनेक आहेत. काही चांगले आहेत काही कसे आहेत 'हे' तुम्हाला चांगेल माहीत, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

राज्यात फोडाफोडीचे वातावरण :सुरत, गुवाहटी, गोवा असे अनेक यात्री असतात. मात्र, संघर्षयात्री खूप कमी असतात. अशा संघर्ष यात्रेकऱ्यांची सगळीकडेच गरज आहे. मात्र, पर्यटन करत फिरणारे यात्री कधी इडके, कधी तिकडे असताता अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. म्हणून राज्यात फोडाफोडीचे वातावरण सुरू आहे. काही जणांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांच्यार केली आहे. देशात सध्या वातावरण विचित्र आहे. देशात आणीबाणी असताना देखील असे वातावरण नव्हते. तेव्हा बोलण्यावर कोणतीही बंधने. नव्हती मात्र, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. पद येतात जातात माणूस म्हणून ओळख महत्वाची असते असे देखील ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेकांनी मला मदत केली असे, देखील ठाकरे म्हणाले. विरोधात बोलणाऱ्याचे आत्ता तोंड दाबले जाते, आणीबाणी काळात अशी बंदी नव्हती अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

शिल्पकारच पळवण्याचा कार्यक्रम सुरू :जी संधी आपल्याला मिळते त्या संधीचा उपयोग आपण देण्यासाठी काय केला. सगळे आम्ही वारसदार म्हटल्यानंतर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार अशी शिकवण दिली जाते. मात्र, आत्ता ज्यांनी घडवले आहे तो शिल्पकारच पळवण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. स्वत:चे कर्तृत्व काही नाही मात्र, शिल्पकारच पळण्याचे प्रकार होत आहेत अशी ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ज्या चळवळीचा स्वतंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता अशा विचारांचे लोक आज देशावर राज्य करीत आहे. तीच विचारसरणी देशाला गिळंकृत करीत आहे अशी टीका देखील त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केली आहे.

पीएम केअर फंडाचा पैसा गेला कुठे? :कोविड काळात चांगले काम केले. मात्र, भाजप विरोधकांची चौकशी करीत आहे. त्यांनी कोविड काळात झालेल्या सगळ्या गैरव्यावहाराची चौकशी करायला हवी. तसेच पीएम केयर फंडाची देखील चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पीएम केअर फंडाचा पैसा गेला कुठे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबईचे कौतुक सगळ्या जगाने केले आहे, त्याच्यावरही विचार करावा विरोधकांनी केला पाहिजे असे देखील ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -Political Crisis In NCP : शरद पवारांनी दिल्लीत बोलावलेली बैठक बेकायदेशीर, अजित पवारांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details