महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : बिनडोक माणूस राज्यपाल म्हणून नको; उद्धव ठाकरे यांचे उद्विग्न वक्तव्य - Uddhav Thackeray

शिवसेना नेते उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी भाजपवर आज चांगलीच टोलेबाजी केली. तसेच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला. बिनडोक माणूस राज्यपाल म्हणून नको अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उद्वेग व्यक्त ( Uddhav Thackeray criticized BJP ) केला.

उद्धव ठाकरे यांचे उद्विग्न वक्तव्य
उद्धव ठाकरे यांचे उद्विग्न वक्तव्य

By

Published : Dec 3, 2022, 2:58 PM IST

Updated : Dec 3, 2022, 10:29 PM IST

मुंबई - उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज भाजपसह राज्यपालांच्या विविध वक्तव्यांचा चांगलाच समाचार ( Uddhav Thackeray criticized BJP ) घेतला. ते मुंबईत बोलत होते. यावेळी संत सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज अनिल राठोड ( Anil Rathod joined Thackeray group ) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार अनंत गीते यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधले. नियोजित महाराष्ट्र भवन करणार अशी घोषणा केली होती, त्याचे काय झाले असे ते म्हणाले. कर्नाटकमधून मिळालेल्या धमकीवर मुख्यमंत्री काही बोलले नाहीत, याबाबत ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.


राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवा -निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याच धर्तीवर राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवायला हवेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कार्यपध्दतीवर जोरदार हल्लाबोल चढवला. राज्यपालाबाबत भूमिका घ्यायला सरकारला अवधी दिला आहे. विचार न झाल्यास निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा ठाकरेंनी दिला. सनदी अधिकारी अजय आशर यांच्या नियुक्तीवर ही सरकारवर टीकास्त्र सोडले.

अनिल राठोड यांचा ठाकरे गटात प्रवेश -सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज आणि माजी आमदार गजधर राठोड, त्यांचे चिरंजीव अनिल राठोड यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. माजी खासदार अनंत गिते यांनी राठोड यांच्या हाती शिवबंधन बांधले. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. निवडणूक आयुक्तांचा नेमका मुद्दा काय, याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यपालांच्या नियुक्तीचे निकष ठरवावेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उठसुठ कोणालाही राज्यपाल बनवू नये. राज्यपालपदासाठी तशा दर्जाच्या माणसांची गरज असते. फक्त माझा माणूस आहे म्हणुन राज्यपाल बनवणे चुकीचे असल्याचे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अरविंद सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख भोला राठोड यावेळी उपस्थित होते.

बिनडोक राज्यपाल नको -उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषद घेत, जोरदार टीका केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल केली आहे. त्याच धर्तीवर राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर केली जावी, हे ठरवायला हवे. उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचे लोक पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असे चालणार नाही अशा शब्दांत ठाकरेंनी ठणकावले.

स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे -महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. उदयनराजे यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी उदयनराजे यांचे आभार यावेळी मानले. उदयनराजे यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगले सांगून राज्यपाल जात नसेल तर महाराष्ट्र काय आहे, दाखवण्याची वेळ आली आहे. घाईघाईने काही केले असे होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू, असा इशारा ठाकरेंनी दिला. तसेच आगामी काळात स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे. मात्र, सत्तेसाठी दिल्लीचे पाय चाटत असेल त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, असा टोलाही शिंदे सरकारला लगावला.

कर्नाटक वादावर मुख्यमंत्र्यांचे मौन -कर्नाटकात मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भवन उभारणार अशी घोषणा केली होती. सरकार बदलल्यानंतर स्थिगिती दिली का माहित नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे नाते काय आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून यावर काहीही ऐकायला मिळालेला नाही. कर्नाटकमधून मिळालेल्या धमकीवर ब्र काढत नाहीत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. मुख्यमंत्री असताना स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. कोविड काळात दोन टास्क फोर्स तयार केले. आरोग्य आणि आर्थिक डोलारा सावरण्यासाठी, सध्याच्या सरकारकडून कशा पद्धतीने कामकाज सुरु आहे हे बघत असल्याचे ठाकरे म्हणाले.

आरेमध्ये कारशेडची गरज नव्हती -कांजूरमार्ग कारशेड सत्तेवर येताच आरेतील कारशेड वरील स्थगिती उठवली. गरज नसताना आरेत कारशेडचा घाट सुरु आहे. आजही कांजूरमार्ग येथील ओसाड जागा कारशेड साठी वापरात येईल. परंतु, इगोसाठी सगळा प्रकार सुरु असल्याचे ठाकरे म्हणाले. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने मित्र ची स्थापना करुन भाजपने आरोपांचा ठपका ठेवलेल्या अजय आशर यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. उद्धव ठाकरेंनी यावरुनही भाजपला खडसावले. सरकार माझ्या काळात सरकार झाले असते तर वेगळा विषय झाला असता. आज आरोप करणारे मांडीला मांडी लावून बसले आहेत, असा टोला आशिष शेलार यांचे नाव न घेता लगावला.

Last Updated : Dec 3, 2022, 10:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details