मुंबई- प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेवर बोलण्यापेक्षा ओवैसीवर बोलावे, असा पलटवार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून टीका केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही वाचा -एमआयएमसोबत आमची युती कायम - अॅड. प्रकाश आंबेडकर
गडकिल्ल्याबाबत कोणी काही करणार नाही -
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, महाराजांच्या गडकिल्ल्याबाबत कोणी वेडे-वाकडे करेल, असे वाटत नाही. म्हणून मी आतापर्यंत काही बोललो नसल्याचे स्पष्टीकरण देखील ठाकरेंनी दिले. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध असल्याची शिवसेनेची भूमिका जगजाहीर असल्याचेही उध्दव ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा -रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन
घुसखोरांना आम्ही हाकलणारच -
बाळासाहेब ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात आवाज उठवला होता. खुसखोर बंगलादेशी आहेत, त्यांना देशाच्या बाहेर काढायलाच हवे, कोणी त्यांना मांडीवर बसविण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनी बसवावे, अशी उध्दव ठाकरे यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.