मुंबई:जळगाव येथे उद्धव ठाकरे हे मोदींचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, ''मै फकीर आदमी हूँ, झोला उठा के चला जाऊंगा'', असे सांगतात. ते निघून जातील पण, जनतेच्या हातात कटोरा देतील असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. ठाकरे यांच्या सभेची आज राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून यावर पलटवार केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदेनी देखील ठाकरेंच्या सभेवर तोंडसुख घेतले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य निंदाजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वावर जगभरात नाव कमावले आहे. त्यामुळेच 'जी 20'चे नेतृत्व भारताला मिळाले आहे. पंतप्रधान मोदी दीडशे कोटी जनता परिवार मानतात. त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी कामाला महत्त्व देऊन राष्ट्रभक्ती सिद्ध केली; मात्र ठाकरे यांनी वक्तव्य वैयक्तिक द्वेषातून केले आहे. लोकप्रियतेने पछाडलेल्या व्यक्तीमुळे काहींना पोटदुखी झाली आहे. त्यातून पंतप्रधान मोदी यांच्यावर अशी टीका केली गेली; परंतु ही बाळासाहेबांची संस्कृती होऊ शकत नाही. ही राजकीय विचारधारा देखील नाही. उलट सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे उदाहरण मागील काळात दिसून आल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक दिवसीय परिषद दुपारी पार पडली. बदललेले वातावरण, ग्लोबल वॉर्मिंग, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या प्रश्नांवर परिषदेत चर्चा झाली. दरम्यान, बदलत्या वातावरणीय बदलांवर उपाययोजना सुचवण्यात आल्या. तसेच राज्यातील जनतेला यातून कशा प्रकारे दिलासा देता येईल, यावरही चर्चा झाल्याचे शिंदेंनी सांगितले. त्यांनी परिषदेत वाढत्या उष्माघाताचा देखील आढावा घेतला.
CM Eknath Shinde Reply Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींवरील ठाकरेंची टीका वैयक्तिक द्वेषातून; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाचोर्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, लोकप्रियतेची पोटदुखी झाल्याने उद्धव ठाकरे यांनी वैयक्तिक द्वेषातून टीका केली. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि निंदनीय असून ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही, असा टोलाही शिंदेंनी लगावला.
यापूर्वीही ठाकरेंवर टीकास्त्र: एकनाथ शिंदेंनी यापूर्वीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदे यांना विरोध असल्यामुळेच आपण मुख्यमंत्री झाल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी 6 जुलै, 2022 रोजी दिली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार पलटवार केला होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते. उलट उद्धव ठाकरे यांनाच मला मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेनेच्या नेत्यांना याबाबत विचारले असता, त्यावर बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्री पदाबाबतच्या वादावर विचारले असता, संजय राऊत यांनीदेखील याबाबत चुप्पी साधली आहे.
हेही वाचा:Deshmukh Met Bawankule : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुखांनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट