मुंबई : गुरुवारी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक झाली, या बैठकीला उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. त्या बैठकीच्यावेळी उद्धव ठाकरे हे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसले होते. त्यावरुन राज्यातील भाजपने उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिंदुत्व टीका केली होती. त्याचबरोबर पाटण्यात उद्धव ठाकरे परिवार बचाव बैठकीवर गेले होते. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी गर्भित इशारा दिला आहे. देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे. तुमच्या परिवाराचे पण व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्याविषयी अजून बोललो नाही. त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला.
परिवारावर जाऊ नका : देवेंद्रजी तुम्हालाही परिवार आहे. तुमच्या परिवाराचे पण व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्याविषयी अजून बोललो नाही. त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. तुम्हाला कोणतीही आसन झेपणार नाही. फक्त झोपावे लागेल असा गर्भित इशारा ठाकरेंनी दिला. मुंबईतील दादरमधील शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करत असताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना इशारा दिला. आपण सर्वजण परिवाराबाबत संवेदशनील आहे. मीही आहे. सूरज आणि शिवसैनिक हे माझे कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. आम्ही कोणाच्या घरात जात नाहीत. जर घर आणि परिवारावर बोलून तर तुम्हाला फक्त योगासन करावे लागले, तेही शवासनमी परिवाराबाबत संवेदशनील आहे. शिवसैनिक माझे कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.