मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri east by poll election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऋतुजा लटके यांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला ( Prasad Lad criticizes Uddhav Thackeray ) आहे.
Prasad Lad : ऋतूजा लटकेंना उमेदवारी न देण्यावरून प्रसाद लाड यांचे मोठे वक्तव्य
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri east by poll election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऋतुजा लटके यांना उमेदवारी न देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार असल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला ( Prasad Lad criticizes Uddhav Thackeray ) आहे.
२५ वर्षे सत्ता आहे पण नियम माहित नाहीत का? :ऋतुजा रमेश लटके ( Rutuja Latke ) या वहिनींच्या उमेदवारीच्या बाबतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने माझे उद्धवजी ठाकरे यांना दोन ते तीन प्रश्न आहेत. ऋतुजा लटके यांना उमेदवारी द्यायची होती तर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यासाठी इतका उशीर का केला? याचे उत्तर शिवसेना नेतृत्वाने द्यावे. शिवसेना नेतृत्वामध्ये उमेदवारी देण्यावरून असलेले मतभेद यावरून निश्चित होतात. महापालिकेमध्ये मागील २५ वर्षे सत्ता असल्यानंतर महापालिकेचे नियम काय आहेत? महापालिका कशा पद्धतीने चालते? हे आम्ही त्यांना सांगण्याची गरज नाही.
राजीनामा द्यायला मुद्दाम उशीर केला? : पुढे प्रसाद लाड म्हणाले की, ऋतुजा लटके यांना राजीनामा मुद्दामहून उशीर केला. तसेच एक सोडून दोन राजीनामे द्यायला लावलं. हे राजीनामे देण्यासाठी उशीर का झाला आहे? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं असेही लाड ( shiv sena favorite in andheri east bypoll election) म्हणाले. तसेच प्रत्येक वेळी कुठलीही गोष्ट झाली तर त्यामध्ये भाजप, तसेच मुख्यमंत्री एकनाथ व देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप सातत्याने करतात. हे त्यांनी बंद करायला हवं. मला वाटतं यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात आहे. हे त्यांचे षडयंत्र आहे. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना डावलायचं तसेच आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं हे जे झालं आहे, नाट्य घडलं आहे हे त्याच्यामुळेच घडलं आहे. म्हणून मला वाटतं की, ऋतुजा रमेश लटके वहिनींना उमेदवारी न देण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असेही प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.