मुंबई - केंद्र सरकारने ज्याप्रमाणे काश्मीरसाठी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला त्याचप्रमाणे राममंदिर निर्माणाचा निर्णयही घ्यावा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
कलम ३७० प्रमाणेच मोदी सरकारने राममंदिर निर्मितीचाही निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदीर निर्माण
राम मंदिर मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परीषद घेतली. यावेळी, त्यांनी केंद्र सरकारने ज्याप्रमाणे काश्मीरसाठी 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला तसाच निर्णय राममंदिर निर्माणासाठी घ्यावा अशी मागणी केली आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरसाठी आग्रही आहोत. कोर्टाचा योग्य निर्णय येईल. केंद्र सरकारने सुद्धा आता योग्य पाऊले उचलली पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही पहिल्या दिवसापासून राम मंदिरसाठी आग्रही आहोत. कोर्टाचा योग्य निर्णय येईल. केंद्र सरकारने सुद्धा आता योग्य पाऊले उचलली पाहिजेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राने वेगळा कायदा करून मंदिर उभारणीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास असून आपण कोर्टाच्या सकारात्मक निर्णयाची वाट पाहत असल्याचे ठाकरे म्हणाले. शरद पवारांच्या पाकीस्तानविषयी वक्तव्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, देशभक्तीपुढे काहीही नसते. त्यांना जनताच उत्तर देईल. गेल्या निवडणुकीतही नागरिकांनी पवारांचा पराभव केला आहे.