मुंबई - मला फोडलेली माणसे नको आहेत तर मनाने जिंकणारी माणसे हवी आहेत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले. मी घड्याळाचे काटे काढले नसून फक्त चावी देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष प्रवेश करणार नाहीत, असे म्हणत ठाकरेंनी पवारांनाही टोला लगावला. मला खात्री आहे आपल्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होणार नसल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.
हिंदूची ताकद वाढतेय
नुसती शिवसेनेची नाही तर मराठी माणसांची आणि हिंदुंची ताकद वाढत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ताकद वाढल्यामुळे हिंदू व मराठी माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. सर्वांनी हसत मुखाने शिवसेनेत प्रवेश केला, आपण या क्षणाचे साक्षीदार झालात याचा आनंद होत असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेनेत चांगले लोक येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे.
घड्याळाचे काटे काढले नसून, फक्त चावी देण्याचे काम केले - उद्धव ठाकरे आमचं आम्ही ठरवलंय
सचिन अहिर यांच्यावर कोणती जबाबदारी देणार असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की आमचं आम्ही ठरवलंय. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. अहिर यांच्यावर पश्चातापाची वेळ येणार नसल्याचेही ठाकरे म्हणाले. निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसमोर जावे लागत आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आदित्य फिरत आहे. दोन्ही पक्षांच्या यात्रा वेगळ्या वाटल्या तरी युतीच्या विजयासाठीच असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.