मुंबई :उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांकडून नव्या युतीच्या नांदीबाबत सध्या चर्चा सुरू (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar alliance) आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही समावेश होणार का ? या चर्चांना उधाण आले (Vanchit Bahujan Aghadi will in Mahavikas Aghadi) आहे. मात्र अद्याप तरी वंचित बहुजन आघाडी बाबत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही चर्चा केली नाही. मात्र जर महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीला यायचा प्रस्ताव असेल, तर त्याचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया देताना शरद पवार
युती करणार असल्याचे संकेत :होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का? याचे चाचणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून सुरू आहे. तिन्ही पक्ष महाविकास आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे. हीच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळेल, अशी वक्तव्ये तिन्ही पक्षाच्या मुख्य नेत्यांकडून केली जात आहेत. सध्या राज्यात असलेले शिंदे - फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही. पुढील दोन ते तीन महिन्यात मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याची सातत्याने वक्तव्य महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीला सत्ताधारी पक्षाला अद्दल घडवण्याची तयारी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाकडून केली जात आहे. मात्र नुकतेच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू करून वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्याशी युती करणार असल्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीचा समावेशाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चलबिचल पाहायला मिळते.
वंचित आणि ठाकरे गटाची युती :प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याच्या ऑनलाईन प्रकाशन या कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. त्यामुळे येत्या काही दिवसातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होईल यावर जवळपास शिक्का मुहूर्त झाला आहे. हे दोन्हीही पक्ष असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि खास करून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र लढतील, अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी मत आल्यामुळे याचा काहीसा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसेल याचीही शक्यता वर्तवण्यात येत (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) आहे.
वंचितच्या मुद्द्यावरप चर्चा नाही :प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेहमीच राजकीय विरोधक राहिले आहेत. अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकीय कोंडीच्या परिस्थितीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वेळा राजकीय वाद प्रतिवाद झालेले देखील पाहायला मिळाले आहेत. पण महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे ठाकरे गटाला वंचित बहुजन आघाडीची युती करताना राष्ट्रवादी काँग्रेसची सल्लामसलत करावा लागेल. यातच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची सध्या अंतिम टप्प्यात बोलणे सुरू असून अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांच्यासोबत याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी याबाबत चर्चा केल्यावर याचा निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडी सोबत युती करण्यासाठी हिरवा कंदील असला तरी अद्याप महाविकास आघाडीत पण आघाडीचा प्रवेश होईल का? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar alliance) नाही.
काँग्रेसकडून वंचितचे स्वागत :भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. विधानसभा निवडणुका असो किंवा लोकसभा निवडणुका असो, या सर्व लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे. यासाठी काँग्रेसने नेहमीच प्रयत्न केले आहेत. वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेचे राजकीय चर्चा नक्कीच केली जाऊ शकते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर येणार असतील, तर त्याचे सुरेशकडून स्वागत केले जाईल, असे मत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे.