महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtras love for Ayodhya : ठाकरे घराण्याने जपले नाते उद्धव, आदित्यनेही केले दौरे पाहुया महाराष्ट्राचे आयोध्या प्रेम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला आयोध्येला जात आहेत. अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत जात असून ते सात एप्रिलला मुंबईतून निघाले आहेत. मात्र महाराष्ट्रातील नेत्यांचे आयोध्या कनेक्शन काय आहे अयोध्येच्या प्रेमात असलेल्या महाराष्ट्र नेत्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेऊया. ( Maharashtras love for Ayodhya)

Shiv Sena has maintained its relationship with Ayodhya, Uddhav Thackeray also visited
शिवसेनेने आयोध्येशी नाते कायम ठेवले आहे उद्धव ठाकरेनी पण दौरा केला होता

By

Published : Apr 7, 2023, 5:44 PM IST

Updated : Apr 7, 2023, 5:50 PM IST

मुंबई:प्रभू रामचंद्राची आयोध्या नगरी ही नेहमीच महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी आत्मीयतेचा विषय ठरली आहे. वास्तविक प्रभू रामचंद्र हे हिंदुत्वाचे प्रतीक मानले गेल्यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांनी प्रभू रामचंद्रांचया भोवती आपले राजकारण गेल्या काही वर्षापासून फिरते ठेवले आहे. म्हणूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काही राजकीय पक्षांना यश आल्याचे दिसते. यामध्ये मुख्यत्वे भाजपा आणि महाराष्ट्रातील शिवसेना पक्षांचा समावेश आहे. वास्तविक राम मंदिर आणि अयोध्या हा मुद्दा राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून कळीचा ठरला होता

हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी : 1970, 1980, 1990 आणि त्यानंतरही मंदिर वही बनायेंगे या एका घोषणेने देशाचे राजकारण व्यापले होते महाराष्ट्राचं राजकारण ही या घोषणे भोवती काही काळ फिरत राहिले. अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचे निर्माण झाले मात्र आयोध्या आणि प्रभू रामचंद्र राजकारणातून दूर झाले नाहीत. कारण अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधले गेले असले तरी हिंदुत्व हा मुद्दा अजूनही राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.


महाराष्ट्रातील नेत्यांना आकर्षण :1992 मध्ये बाबरी ढाचा पाडल्यानंतर शिवसेनेने त्याची जबाबदारी स्वीकारत आपण कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रभू रामचंद्राचे पाईक असल्याचा दावा केला. या घटनेपासूनच अयोध्या आणि शिवसेनेची नाळ जुळली. शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्याला सातत्याने उचलून धरले तर आपण कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे वारंवार स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांचे आयोध्या दौरे :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2018 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि 2019 जून मध्ये सर्व खासदारांसह अयोध्येचा दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अडीच हजार शिवसैनिकही राम लल्ला चे दर्शन घेण्यासाठी गेले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर ठाकरे यांनी शंभर दिवस सत्तेचे झाल्यानंतर अयोध्येचा पुन्हा एकदा दौरा केला होता त्यामुळे अयोध्या आणि शिवसेना यांचे नाते पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

संजय राऊत, आदित्यही दौऱ्यावर :शिवसेना नेते आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही अयोध्येचा दौरा केला यावेळी खासदार शिवसेना नेते संजय राऊत त्यांच्यासोबत होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुका दरम्यान आदित्य ठाकरे यांनी अयोध्येत दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे हिंदुत्व आणि राम हे शिवसेनेच्या रक्तात असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी त्यावेळी केला होता.

राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन वाद :मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आपले हिंदुत्व अबाधित आहे आणि प्रभू रामचंद्र आणि अयोध्या यांच्याशी आपलेही नाते आहे हे दाखवण्यासाठी अयोध्येचा दौरा आयोजित केला होता मात्र अयोध्येच्या खासदारांनी याला तीव्र विरोध केल्याने राज ठाकरे यांना आपला दौरा स्थगित करावा लागला होता. त्यानंतर अद्याप राज ठाकरे यांनी आपल्या पुढील दौऱ्याची तारीख जाहीर केलेली नाही मात्र अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा त्यांचा मानस कायम आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर :दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत यापूर्वी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते मात्र शिवसेनेतून बाहेर पडत वेगळा गट स्थापन केल्यानंतर आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते अयोध्येच्या दौऱ्यावर 9 एप्रिल रोजी जात आहेत. हिंदुत्वाचे आपले नाते कायम आहे आणि आपणच हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा त्यांचा या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे.


रोहित पवार ही अयोध्येत :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीबी मधल्या काळात अचानक अयोध्येचा दौरा केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्ला चे दर्शन घेतले आहे. राष्ट्रवादी काॅग्रेसचे रोहित पवार अचानक अयोध्येला गेले आणि एकच चर्चा सुरु झाली पण त्यांनी मी राम भक्त म्हणुन दर्शनाला आलो आहे असे सांगत चर्चांना पुर्णविराम दिला होता. त्यामुळे अयोध्येशी महाराष्ट्रातील नेत्यांचे नाते कायम आहे हेच समोर येत आहे.

हेही वाचा :Eknath Shinde Ayodhya Visit : एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा, जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमले ठाणे रेल्वे स्थानक!

Last Updated : Apr 7, 2023, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details