मुंबई - विदर्भात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या पूरसदृश स्थितीमुळे या भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण येत आहे. या पार्श्वभुमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी संवाद साधला. त्यावर धोत्रे यांनी या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
विदर्भातील जेईई-नीटच्या विद्यार्थ्यांचे कसलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही - उदय सामंत - uday samant news
१ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे कठीण आहे. याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना सामंत यांनी दिली आहे.

१ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये जेईई मुख्य आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी नीट परीक्षा होणार आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला येथे जेईई-नीटच्या परीक्षाचे केंद्र आहेत. सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत परीक्षा होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पुलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचणे कठीण आहे. याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांना सामंत यांनी दिली आहे.
त्यावर धोत्रे यांनी या भागातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन आपल्याला दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी काळजी करू नये, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असे सामंत म्हणाले. दरम्यान, आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या नीट - जेईई या दोन्ही परीक्षेला राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करता येणार आहे. तर मुंबईतील विद्यार्थ्यांना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून लोकलने प्रवास करण्याची विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली आहे.