मुंबई :बारसू रिफायनरी संदर्भातील माहिती देण्यासाठी उद्योगपती उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती, नाट्य परिषदेच्या संदर्भात भेट घेतल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रिफायनरी प्रकल्पासंदर्भात उद्योग मंत्री, यांच्याशी फोन द्वारे संवाद साधला होता. त्यावेळी उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतची माहिती आपल्याला देतो, असे म्हणाले होते. त्याप्रमाणे आज उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. माझी तब्येत बरी नसल्याच्या बातम्यांमध्ये कोणते तथ्य नाही असेही ते म्हणाले.
चर्चा करण्यात तयार : प्रकल्पासंदर्भातील आंदोलकांच्या तेथील परिस्थिती बाबतचा सर्व आढावा मी शरद पवार यांना दिला आहे. आंदोलन ठिकाणी काही महिलांना पोलिसांनी अटक केली होती. त्या महिलांना देखील काल सोडून देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर त्यांना घरपोच सोडून जेवणाची देखील व्यवस्था केली होती. सरकारने शेतकऱ्यांसोबत चर्चा केलीच पाहिजे. ही देखील आमची भूमिका असून तिथल्या स्थानिक आंदोलक, शेतकरी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही 24 तास बोलण्यास तयार आहोत. स्थानिक लोकांनी याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन देखील उदय सामंत यांनी केले आहे.