महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्यावर ठाम, तरीही यूजीसीच्या निर्णयाची वाट पाहू - उदय सामंत - परीक्षांवर कोरोनाचा प्रभाव

अंतिम वर्षांच्या परीक्षेवर राजकारण होत असल्याचे सांगत यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही अडचणीत आणणार नाही. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत. मात्र, यूजीसीच्या २९ तारखेच्या पत्रात परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आला असता तर आम्ही तशी तयारी केली असती. पण बुधवारी यूजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना देऊन संभ्रम निर्माण केला असल्याचेही सामंत म्हणाले.

uday samant latest news  uday samant on university exam  corona effect on university exams  final year exams 2020  अंतिम वर्ष परीक्षा २०२०  परीक्षांवर कोरोनाचा प्रभाव  विद्यापीठ परीक्षांबाबत उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Jul 9, 2020, 6:18 PM IST

मुंबई - राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊनच आणि लाखो विद्यार्थ्यांचा हितासाठी आम्ही अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताची चिंता करतो. परंतु, बुधवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी करून या परीक्षा घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर होण्यासाठी मी तातडीने पत्र लिहून आमची भूमिका स्पष्ट केली असून त्यावर यूजीसीकडून काय उत्तर येते? याची वाट पाहू, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत

अंतिम वर्षांच्या परीक्षेवर राजकारण होत असल्याचे सांगत यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही अडचणीत आणणार नाही. राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत. मात्र, यूजीसीच्या २९ तारखेच्या पत्रात परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचा उल्लेख आला असता तर आम्ही तशी तयारी केली असती. पण बुधवारी यूजीसीने नवीन मार्गदर्शक सूचना देऊन संभ्रम निर्माण केला असल्याचेही सामंत म्हणाले.

राज्यातील सर्वच कुलगुरू आणि विद्यार्थी संघटना परीक्षा घेण्याच्या विरोधात आहेत. त्यासाठी कुलगुरुंनी काय माहिती दिली? याची एक चित्रफीतही सामंत यांनी यावेळी दाखवली. जे विद्यार्थी गावी गेलेत, पेपर कोण काढणार, जे कंन्टेमेंट झोनमध्ये आहेत त्यांचे काय करायचे? असे अनेक प्रश्न आमच्यापुढे आहे. त्यामुळे परीक्षा न घेण्याची आमची भूमिका कायम असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात परीक्षा घेण्यासाठी गुणाचे सूत्र ठरवले आहे. त्यात एकूण उच्च शिक्षण घेणाऱ्या ३४ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात आणले जाईल. परीक्षा घेणार नाही, यावर ठाम आहोत. मात्र, कुलगुरुंनी बैठक घेऊन परीक्षा आणि त्याचे सूत्र ४ जुलैला ठरवण्याची बैठक घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी यूजीसीने नवीन सूचना काढली. यामुळे मागे काय राजकारण आहे हे सांगू शकत नसल्याचे सामंत म्हणाले

सरकट परीक्षा रद्द केली नाही. परंतु, त्यासाठी गैरसमज पसरवला जात आहे. ज्यांना परीक्षा हवी आहे, त्यांची परीक्षा घेणारच आहोत. त्यासाठी पर्याय देणार आहोत. परीक्षा रद्द केली म्हणजे त्यांना पुढे संधी मिळणार नाही, असे नाही. त्यामुळे अजून तीन दिवस वाट पाहणार आहोत. केंद्र आणि यूजीसीकडून माझ्या पत्राला काय उत्तर येते? याची वाट पाहणार असल्याचे सामंत म्हणाले.

एटीकेटीच्या संदर्भात 13 विद्यापीठातील कुलगुरुंनी आपले मत दिले आहे. सोलापूर विद्यापीठाने या एटीकेटीच्या परीक्षा घेण्याचे नाकारले असल्याने त्याला अनेक कुलगुरुंनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे एटीकेटीसाठी सर्व विद्यापीठांनी एकच निर्णय ठेवावा, असेही मत मांडले असल्याने तो विषयही मार्गी लागणार आहे. तसेच सरासरी बेसवर एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पास करावे, अशी शिफारस आली आहे. त्यात दुसरा पर्याय हा ग्रेस मार्क देण्याचा निर्णय समितीने दिला आहे. तसेच पुन्हा एटीकेटीची परीक्षाही घेण्यात येऊ नये, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठाची बैठक घेऊन काही निर्णय घेत असल्याचे सामंतांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details