महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dasara Melava : राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी आझाद मैदानावर येतील - मंत्री उदय सामंत - मंत्री दीपक केसरकर

Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत असून, मुख्य व्यासपीठ व खुर्च्यांची मांडणी या कामांची लगबग जोरात सुरु आहे. काही तासांवर हा दसरा मेळावा येऊन ठेपला आहे. शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. तर शिवसेना फूटीनंतर शिंदे गटाचा हा दुसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्याची तयारी कशा प्रकारे सुरु आहे, याची पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आझाद मैदान येथे भेट दिली.

Uday Samant
मंत्री उदय सामंत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 10:57 PM IST

मुंबईDasara Melava : एकिकडे मराठा आरक्षण, ड्रग्ज यावरुन वातावरण तापले आहे. तर दुसरीकडे आणि सत्ताधारी-विरोधक यांच्यात जुंपली असताना, दुसरीकडे दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट व शिंदे गट यांच्यात चांगलेच वातावरण तापले आहे. उद्या (24 ऑक्टोबर) रोजी दोन्ही गटांचे दसरा मेळावा पार पडत आहेत. ठाकरे गटाचा 'दसरा मेळावा' शिवाजी पार्क येथे होत आहे, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदान येथे होत आहे.

आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा: शिंदे गटाचा दसरा मेळाव्याची तयारी कशा प्रकारे सुरु आहे, याची आज पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आझाद मैदान (Azad Maidan) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, उद्याचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा विक्रमी संख्येचा असेल. मागील वर्षीपेक्षा यावर्षीच्या दसरा मेळाव्याला विक्रमी कार्यकर्ते असतील, असं मंत्री उद्य सामंत यांनी सांगितलं.


खरा विचारांचा दसरा मेळावा हाच :दरम्यान, पुढे बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, खरा विचारांचा दसरा मेळावा हाच आहे. आम्ही विकास काम आणि जनतेसाठी काम करत आहोत, त्यामुळं इतरांसारखे आम्ही शिव्यांचा वापर करत नाही, असं म्हणत सामंत यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. तसेच यावेळी राज्यभरातून शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्ते आझाद मैदानवर येतील. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. याचीच आज पाहणी करण्यासाठी आम्ही आलो होतो. यावेळ त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) देखील उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Shiv Sena Dasara Melava : शिवतीर्थावर असणारा दसरा मेळावा रडगाणं गाणारा असेल-मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
  2. Uddhav Thackeray VS Eknath Shinde : शिंदे गटानं शिवाजी पार्कचा आग्रह का सोडला? अनिल परब यांनी 'हे' सांगितले कारण
  3. Dasara Melava : दसरा मेळाव्याच्या संघर्षातून शिंदे गटाची माघार; मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर....

ABOUT THE AUTHOR

...view details