महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Udan Project : खूशखबर! उच्च शिक्षणात इंग्रजीची अडचण होणार दूर; आयआयटी मुंबई उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा नवा प्रकल्प - Translation Without Internet

आयआयटी मुंबई उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून संयुक्त प्रकल्प उभारण्यात येत आहे. उडान प्रकल्प राज्यातील उच्च शिक्षणासाठी साकार होणार ( Udan Project for higher education ) आहे. बहुतांशी उच्च शिक्षण इंग्रजी भाषेत होते. त्यांचे ट्रान्सलेशन खूप अवघड असते. उडान प्रकल्पामुळेच आता विद्यार्थ्यांच्या भाषेच्या अडचणी सुटणार आहेत.

Udan Project
उडान प्रकल्प

By

Published : Jan 9, 2023, 12:20 PM IST

मुंबई :जगाचे ज्ञान बहुतांशी इंग्रजी भाषेमध्ये ( Higher Education in English language ) आहे. याचे कारण युरोपमधील प्रबोधनाचे युग आणि त्या ठिकाणी विस्तारलेला आणि खोलवर रुजलेला वैज्ञानिक दृष्टिकोन. यामुळे अनेक मूलभूत आणि विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रातील शोध किंवा वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील शोध देखील इंग्रजी भाषेतूनच आपल्याला कळतात. इंग्रजी भाषेच्या संदर्भात येणारी अडचण लक्षात घेऊन आता आयआयटी मुंबई आणि राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील शिक्षण संस्था एकत्र काम करणार ( Udan Project solve students Language problem ) आहेत. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त उडान प्रकल्पाची सुरुवात होत आहे.


उडान प्रकल्प राज्यातील उच्च शिक्षणासाठी : कोणत्याही विद्यार्थ्याकडे आपल्या मातृभाषेतून आणि आपल्या परिसरातून जे ज्ञान, जे व्यवहार, जे अनुभव मिळतात त्यातून ते स्वतः शिकतात. मात्र शाळेबाहेरच्या ज्ञानाला आणि कौशल्याला आपण आपल्या मातृभाषेशिवाय इंग्रजी भाषेमध्ये मांडू शकत नाही. ही खंत अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना असते.मात्र या मर्यादांना पार करण्याचे राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण संस्था ( Higher and Technical Education )आणि आयआयटी मुंबई ( IIT Mumbai ) यांच्या एकत्रित उडान प्रकल्पामुळे हे साध्य होणार आहे.

काय आहे हा उडान प्रकल्प :आयटी मुंबईच्या मदतीने उडान प्रकल्प राज्य शासनाने तयार केला आहे. यात मशीनच्या मदतीने कोणत्याही भाषेतील भाषांतर आणि त्याचे संपादन केले जाऊ शकते. अकरा भारतीय भाषांमध्ये परदेशी भाषांचे भाषांतर देखील केले जाते. राज्यातील विद्यापीठांमध्ये महाविद्यालयांमध्ये या पद्धतीच्या सॉफ्टवेअरचादेखील आता वापर केला जाणार आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यपुस्तके समजायला हवी. पारंपारिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे देखील त्यांना लवकर ज्ञान होणे गरजेचे आहे. इंग्रजीमधून आपल्या ज्ञानाला मांडल्यामुळे परीक्षा असो किंवा मुलाखत असो आत्मविश्वास देखील ( Translation Without Internet ) येतो.

असा राबविला जाणार उडान प्रकल्प :राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी याबाबत भाषांतराच्या संदर्भात एक गट स्थापन करायला हवे. या गटाच्या मार्फत आयआयटी मुंबईमधील जे प्रोफेशनल अर्थ व्यवसायिक प्राध्यापक तंत्रज्ञ आहेत. त्यांच्याकडून राज्यातील या गटाला प्रशिक्षण दिले जाईल. जेणेकरून कोणत्या प्रकारे, कोणत्या पद्धतीने, कोणत्या अभ्यासक्रमासाठी कसे भाषांतर अपेक्षित आहे. याच्या संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाईल. मशीन ट्रान्सलेशन अर्थात एमटी कम्प्यूटर, एलईडी ट्रान्सलेशन यांच्याद्वारे उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी उडान प्रोजेक्ट या संकेतस्थळावर विद्यार्थी भेट देऊ शकतात.

आयआयटी मुंबईकडून प्रशिक्षण :यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव विकास रस्तोगे यांनी ईटीवीसोबत संवाद साधताना सांगितले की," बदलत्या युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात अनेक प्रकारचे नवनवीन शोध लागलेले आहेत. परंतू इंग्रजी भाषेच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांना काही एक मर्यादा येतात. त्या मर्यादा पार करण्यासाठी भाषांतर जरुरी आहे. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेने भाषांतर संदर्भातला गट स्थापन करायला हवा. त्यांना आयआयटी मुंबईकडून प्रशिक्षण दिले जाईल.

भाषांतराच काम देखील वेगाने होत आहे :यासंदर्भात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की,"या उडान प्रकल्पामध्ये एंड टू एंड मशीन ट्रान्सलेशन फ्रेमवर्क केले जाते. आपल्याला न समजणाऱ्या परिभाषा आणि शब्द याचा नेमका अर्थ सांगण्याचे काम हे मशीन करते. याला पोस्ट एडिटिंग प्लॅटफॉर्म सुद्धा म्हणता येतो. कारण या ठिकाणी त्या प्रकारची इकोसिस्टीम वेगाने काम करते आणि तांत्रिक कामे वेगाने केल्यामुळे भाषांतराच काम देखील वेगाने होत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्या त्या पारिभाषिक शब्दांसह तो अर्थ प्राप्त होऊ शकतो. "इच्छूक विद्यार्थ्यांनी उडानबाबत या संकेतस्थळावर भेट दिल्यास यासंदर्भात प्राथमिक माहिती आणि सखोल माहिती देखील मिळू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details