महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

UCC QR Code : यूसीसी कायद्याचा विरोध करण्यासाठी मशिदीत यूसीसी क्यूआर कोड - युनिफॉर्म सिव्हिल कोड

समान नागरी संहितेबाबत, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मशिदींमध्ये 'No UCC' QR कोड बसवण्यास सुरवात केली आहे. UCC कायद्याच्या निषेधार्थ मुंबईतील मालाडच्या पूर्व पठाणवाडी येथील नूरानी मशिदीत विरोध करण्यासाठी एक UCC क्यूआर कोड बसवण्यात आला आहे.

UCC QR Code
UCC QR Code

By

Published : Jul 13, 2023, 9:49 PM IST

सलीम भाटी यांची प्रतिक्रिया

मुंबई :समान नागरी संहितेबाबत हालचाली वाढत आहेत. मुस्लीम समाजाचा या कायद्याला विरोध आहे. देशातील मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने युनिफॉर्म सिव्हिल कोडला (यूसीसी) हायटेक पद्धतीने विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पर्सनल लॉ बोर्डाने आता मशिदींमध्ये 'नो यूसीसी' क्यूआर कोड लावले आहेत. तुमच्या फोनमध्ये हा कोड स्कॅन केल्यावर, एक स्वयंचलित ई-मेल तयार होतो, जो थेट कायदा आयोगाकडे पाठवला जातो.

QR कोडसाठी बनवला व्हिडिओ : याबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे म्हणणे आहे की, देशात यूसीसी कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. UCC कायद्याच्या निषेधार्थ मुंबईतील मालाडच्या पूर्व पठाणवाडी येथील नूरानी मशिदीत एक UCC क्यूआर कोड बसवण्यात आला आहे. यासोबतच 'नो यूसीसी' क्यूआर कोड स्कॅन करून जास्तीत जास्त लोकांनी आंदोलन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा कोड कसा वापरायचा याचा व्हिडिओही बनवण्यात आला आहे. अनेक लोक हा कोड आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इतरांना पाठवत आहेत. याबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डाचे अधिकारी सलीम भाटी म्हणाले की, मुस्लिम नेहमीच आपल्या शरियत कायद्याचे पालन करतो. भविष्यातही त्याचे पालन करत राहील. आम्ही संपूर्ण देशात यूसीसी कायद्याला विरोध करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

UCC जी गरज नाही :विधी आयोगाने विविध पक्ष, नागरिकांना 14 जुलैपर्यंत UCC वर त्यांचे आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने 6 महिने वेळ वाढवण्याची विनंती केली आहे. AIMPLB जारी केलेल्या निवेदनानुसार, या संदर्भात आयोगाने जारी केलेली नोटीस अस्पष्ट आहे. आयोगाने याआधीही यूसीसीबाबत जनमत घेतले आहे. त्यावेळीही यूसीसीची गरज नसल्याचा निष्कर्ष निघाला होता. अशा परिस्थितीत आयोगाने पुन्हा जनमत मागवणे समर्थनीय नसल्याचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

हेही वाचा -MP Owaisi On UCC: औरंगाबाद दौऱ्यात समान नागरी कायदाबाबत खासदार ओवेसी साधणार संवाद

ABOUT THE AUTHOR

...view details