महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Zimbabweans Held With Heroin : 50 कोटी रुपयांच्या हेरॉइनसह झिम्बाब्वेच्या दोन नागरिकांना अटक - मुंबई विमानतळ

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) (डीआरआय) दोन परदेशी (Zimbabweans Held With Heroin) नागरिकांकडून (foreign nationals arrested with heroin) 40 कोटी रुपयांचे 8 किलो हेरॉईन जप्त (Heroin Seized on Mumbai Airport) केले आहे.

Zimbabweans Held With Heroin
झिम्बाब्वेच्या दोन नागरिकांना अटक

By

Published : Nov 27, 2022, 7:12 PM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) महसूल गुप्तचर संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence) (डीआरआय) दोन परदेशी (Zimbabweans Held With Heroin) नागरिकांकडून (foreign nationals arrested with heroin) 40 कोटी रुपयांचे 8 किलो हेरॉईन जप्त (Heroin Seized on Mumbai Airport) केले आहे. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेली हलकी तपकिरी पावडर असलेली काही पाकिटे पथकाला आढळून आली आहेत. Latest news from Mumbai, Mumbai Crime

हेरॉईनसह दोघांना अटक :महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 50 कोटी रुपये किंमतीच्या 7.9 किलो हेरॉईनसह दोन झिम्बाब्वेच्या नागरिकांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. गुप्त माहितीच्या आधारे, डीआयआरच्या मुंबई झोनल युनिटने शुक्रवारी विमानतळावर सापळा रचला आणि अदिस अबाबा (इथिओपिया) येथून प्रवास करणाऱ्या एका पुरुष आणि एका महिलेला अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हेरॉईनची किंमत 50 कोटी :त्यांच्या सामानाची झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेली हलकी तपकिरी पावडर असलेली काही पाकिटे पथकाला आढळून आली. पावडरची चाचणी पॉझिटिव्ह आली असून हेरॉइन असल्याचे उघडकीस आले आहे. प्रतिबंधित पदार्थाचे वजन 7.9 किलो आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 50 कोटी रुपये आहे.


एनडीपीएस कारद्यांतर्गत अटक :आरोपींना अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली आणि विशेष न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, असे अधिकारी पुढे म्हणाले. या प्रकरणात गुंतलेल्या ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यासाठी डीआरआय पुढील तपास करत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details