यवतमाळ - जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील दोन तरुणांचा प्रवाहित विद्युत तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला आहे. कादिर कुरेशी आणि फिरोज खान पठाण असे मृत तरुणांची नावे आहेत. ते दोघे डोल्हारी येथील दिलीप राऊत यांच्या घराचे बांधकाम करत होते.
विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने यवतमाळमध्ये दोन तरुणांचा मृत्यू - Death of youth due to lightning strike
यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ढाणकी येथील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोन्ही तरुण बांधाम व्यावसाय करत होते.
![विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने यवतमाळमध्ये दोन तरुणांचा मृत्यू two-youths-died-in-dhanaki-after-being-hit-by-lightning-cables](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5750018-770-5750018-1579319534043.jpg)
विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ढाणकी येथील दोन तरुणांचा मृत्यू
घराचा स्लॅब टाकताना त्याच्या हातातील रॉडला विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्या दोघांना विजेचा जोरदार धक्का लागला. त्या दोघांना उपचारासाठी नांदेड येथे घेऊन जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. डोल्हारी हे गाव नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील असून ढानकी गावापासून अगदी जवळ आहे. त्यांच्या निधनाने ढानकी गावानर शोककळा पसरली आहे.