मुंबई- शहरातील मालाड येथील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले. तरुणांना बुडताना पाहताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंर लाईव्ह गार्ड व स्थानिक मच्छीमार यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. बचाव पथकाला दोघाही तरुणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
मुंबईत अक्सा समुद्रकिनाऱ्यावर २ तरुण बुडाले; एक सुखरूप, तर एकाची प्रकृती चिंताजनक - Aaksa beach Manmad Mumbai news
शहराती मालाड येथील अक्सा समुद्रकिनाऱ्यावर आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले. या तरुणांना लाईव्ह गार्ड व स्थानिक मच्छीमारांनी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. बचाव पथकाला दोघाही तरुणांना बाहेर काढण्यात यश आले.
बचाव पथाकाद्वारे समुद्राबाहेर काढण्यात आलेला एक तरुण सुखरूप आहे. मात्र, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अक्सा समुद्रकिनाऱ्यावर दर महिन्याला कोणती ना कोणती अशा प्रकारची घटना घडते. त्यामुळे समुद्रकिनारी सुरक्षा देणाऱ्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच पाण्यात लोक जाईपर्यंत प्रशासनाला त्याची गंभीरता कळत नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- 'अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचा विषय कधीच ठरला नव्हता.. त्यांना तर पाच वर्षे हवे असेही वाटेल'