मुंबई - आक्सा समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोन तरुणांना जीव रक्षकांनी वाचवले. ही घटना आज सकाळी घडली. हे तरुण मालाडच्या आक्सा समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालाडच्या आक्सा समुद्रकिनारी बुडणाऱ्या दोघांना जीव रक्षकांनी वाचवले - sea
आक्सा समुद्रकिनारी क्रिकेट खेळून झाल्यावर हे तरुण पोहायला पाण्यात उतरले. पण, खोल पाण्यात गेल्यानंतर ते बुडायला लागले. ते खोल पाण्यात जात असतानाच जीव रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता
आक्सा समुद्रकिनारी क्रिकेट खेळून झाल्यावर हे तरुण पोहायला पाण्यात उतरले. पण, खोल पाण्यात गेल्यानंतर ते बुडायला लागले. ते खोल पाण्यात जात असतानाच जीव रक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण, तरुणांनी न ऐकताच पाण्यात प्रवेश केला. बुडणाऱ्या तरुणांना रक्षकांनी रेस्क्यू ट्यूबच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले.
बाहेर काढताच त्यांना तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जीवरक्षक पर्यवेक्षक स्वतेज कोळंबकर, एकनाथ तांडेल,जीवरक्षक चिराग पागदरे, तुषार मेहेर,रुतिक नशीबा, नथुराम सुर्यवंशी या जीव रक्षकांनी त्या दोन तरुणांना सुखरूप बाहेर काढले.