महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'प्रिन्स'ची प्रकृती चिंताजनक; केईएम रुग्णालयाची माहिती - केईएमच्या निष्काळजीपणामुळे प्रिन्सचा हात कापला

महापालिकेअंतर्गत असलेल्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला आहे. बुधवारी महापालिकेने प्रिन्सला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. गुरुवारी सकाळपासून प्रिन्सची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तो उपचारांना साथ देत नसल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

'प्रिन्स'ची प्रकृती चिंताजनक

By

Published : Nov 21, 2019, 7:13 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:40 PM IST

मुंबई -महापालिकेअंतर्गत असलेल्या केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला आहे. बुधवारी महापालिकेने प्रिन्सला 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. गुरुवारी सकाळपासून प्रिन्सची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तो उपचारांना साथ देत नसल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

'प्रिन्स'ची प्रकृती चिंताजनक; केईएम रुग्णालयाची माहिती

हेही वाचा - डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा; शासन दरबारी 49, प्रत्यक्षात विविध रुग्णालयात 50-50 रुग्ण

महापालिकेच्या रुग्णालयात चांगले उपचार मिळतात म्हणून देशभरातून रुग्ण इथे येत असतात. उत्तरप्रदेशमधील मवू मधील प्रिन्स या दोन महिन्याच्या बालकाच्या हृदयात छिद्र असल्याने त्यावर उपचारासाठी पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालकावर उपचार सुरू असतानाच ईसीजी मशीनमध्ये शॉकसर्किट होऊन आग लागली. त्यात प्रिन्स 20 ते 22 टक्के भाजला. त्याचा हात, कान, आणि छातीचा भाग भाजला. गँगरिंग झाल्याने त्याचा हात कापण्यात आला. याचे पडसाद स्थायी समिती, सभागृहात उमटले. प्रिन्सच्या उपचाराचा सर्व खर्च पालिकेने उचलावा, नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपये द्यावेत अशी मागणी करण्यात आली. पालिकेने प्रिन्सच्या कुटूंबियांना 5 लाख देण्याची तयारी दाखवली. हे 5 लाख रुपये प्रिन्सच्या कुटूंबियांनी घेण्यास नकार दिला. त्यानंतर काल बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सध्या प्रिन्सची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्या रक्तदाबामध्ये सतत चढउतार जाणवत आहे. त्याला पूर्णपणे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या या एकंदरीत परिस्थितीबाबत पालकांना माहिती देण्यात आली आहे. प्रिन्सला न्यूमोनिया झाला आहे. याशिवाय त्याच्या फुफ्फुसामध्ये आणि पोटातील संसर्गामध्येही वाढ झाली आहे. प्रिन्स उपचारांना देखील योग्यरित्या प्रतिसाद देत नाही अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - ओटीपी विचारून आरबीएल बँक क्रेडिट कार्ड धारकांना लाखोंचा गंडा

Last Updated : Nov 21, 2019, 11:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details