मुंबई - मुंबईमधील 500 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सोसायटी सदस्यांनी निवडलेली व्यवस्थापन समिती न करता परस्पर पुनर्विकासाचे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये दोन हजार कोटींचे गौडबंगाल असून, या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच यामागणी संदर्भात यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना पत्र लिहिले आहे.
आमदार आशिष शेलार याबाबत बोलताना पत्रात काय लिहिले?
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सोसायट्यांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. याचा फायदा घेत विविध निबंधकाच्या निर्देशानसार मुंबईतील पाचशेहून अधिक गृहनिर्माण संस्था प्रशासकांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. ज्या सोसायट्यांचा कालावधी या दोन वर्षांमध्ये संपत होता. कोरोनामुळे त्या सोसायट्यांमध्ये निवडणुका घेण्यात आल्या नाहीत. या सर्व सोसायट्यांमध्ये प्रशासक नेमण्यात आले आहेत. प्रशासकांनी बिल्डर सोबत संगमत करून सोसायटीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय परस्पर घेतलेला आहे. प्रस्ताविक नियम डावलून बिल्डर आणि प्रशासक यांच्या संगनमताने भ्रष्टाचार केला जाणार आहे. जवळपास दोन हजार कोटींचा हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप आपल्या पत्रातून आशिष शेलार यांनी केला.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ललिलेले पत्र जिथे सोसायटीने सर्वसाधारण सभा न घेता प्रशासकांनी थेट सोसायटी पुनर्विकासाचा निर्णय घेतला आहे, तिथे कारवाई करून पुनर्विकासाचे प्रस्ताव तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी या पत्रातून आशिष शेलार यांनी केली. तसेच याबाबत तातडीने एसआयटी नेमून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हेही वाचा -तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका; राज्य सरकार अलर्टमोडवर