मुंबई- अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दोन अट्टल चोरट्यांना दहीसर पोलिसांनी अटक केली आहे. एका वीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत पैसे लुटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली.
अपहरण, लुटमार प्रकरणातील दोन अट्टल चोरट्यांना अटक - अपहरण, लुटमार प्रकरणातील दोन अट्टल चोरट्यांना अटक
दोन अट्टल चोरट्यांना दहीसर पोलिसांनी अटक केली आहे. एका वीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करत पैसे लुटल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली.
निलेश पांचाळ नावाचा 20 वर्षीय युवक दहिसरहून अम्बवाडी भागात मोटारसायकलवरून जात होता. दरम्यान, रस्त्यावरून चालत निघालेल्या एका महिलेला त्याच्या गाडीची धडक बसली, त्यामुळे महिलेच्या हातातील मोबाईल रस्त्यावर पडून फुटला. मोबाईल फुटलेला पाहून महिलेने रागाने आरडाओरडा केला. या प्रकारामुळे तेथे गर्दी जमली, त्यावर निलेशने महिलेला मोबाईलची भरपाई देऊ, असे सांगून माफीही मागितली. त्यानंतर महिला तेथून निघून गेली. हा प्रकार तेथे एका रिक्षात बसलेल्या महेश शांताराम मोरे (24) आणि मनीष शिंदे (30) या अट्टल चोरट्यांनी पाहिला. गर्दी निघून गेल्यावर या दोघांनी निलेशला बळजबरीने रिक्षामध्ये बसवले आणि दहीसर रेल्वे स्थानकाच्या परिसरात निर्मनुष्य ठिकाणी नेऊन महिलेची छेड का काढलीस असे म्हणत मारहाण केली आणि चाकू दाखवत त्याच्या जवळील १० हजार रुपये चोरून पळून गेले. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.