महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime News: खळबळजनक! आर्थर रोड कारागृहात दोन कैद्यांकडून सहकाऱ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार - आर्थर रोड कारागृहात कैद्यावर लैंगिक अत्याचार

आर्थर रोड कारागृहात कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या दोन कैद्यांनी हे कृत्य केले आहे. याशिवाय आरोपींनी फिर्यादीला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Mumbai Crime News
अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

By

Published : Jun 13, 2023, 6:34 AM IST

Updated : Jun 13, 2023, 7:16 AM IST

मुंबई: दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आता चक्क कारागृहातच अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. आर्थर रोड कारागृहात बंदी असलेल्या एका २३ वर्षांच्या तरुणावर अन्य दोन आरोपींनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेव्हा इतर कैदी झोपले होते. समीर शेख उर्फ पुडी आणि राशीद फराज अशी या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण करुन अनैसर्गिक लैंगिक अत्याचार : मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेला २३ वर्षीय तक्रारदार तरुण हा आर्थर रोड कारागृहात न्यायबंदी आहे. तर आरोपी समीर शेख उर्फ पुडी आणि फराज हे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल गुन्ह्यात अटकेत असून ते सूद्धा आर्थर रोड कारागृहात बंदी आहेत. या दोन्ही आरोपींनी तक्रारदार तरुणाला 6 जूनच्या रात्री पावणे दोनच्या सुमारास कारागृहातील स्नानगृहाच्या कोपऱ्यात नेत मारहाण करुन त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी या आरोपींन त्याला दिली होती.


पीडित तरुणाची वैद्यकीय तपासणी :भीतीपोटी या तरुणाने याची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र ९ जूनच्या पहाटे चारच्या सुमारास पून्हा या दोन्ही आरोपींनी तक्रारदार तरुणाला बॅरेकमध्ये जात शिविगाळ करुन मारहाण केली. अखेर पीडित तरुणाने अत्याचाराला वाचा फोडत कारागृह प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणाला वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी या पीडित तरुणाची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Jun 13, 2023, 7:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details