मुंबई - राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एकूण 106 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपले कर्तव्य बजावत असताना आतापर्यंत राज्यात 146 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 15 पोलीस अधिकारी व पोलीस 131 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत 106 पोलिसांना कोरोनाची लागण, तर 2 पोलिसांचा मृत्यू - कोरोना पॉझिटिव्ह पोलीस न्यूज
कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून एकूण 106 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 14 हजार २९५ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 1 हजार 517 पोलीस अधिकारी तर 12 हजार 769 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2 हजार 622 पोलीस कोरोनावर उपचार घेत आहेत. यात 347 पोलीस अधिकारी व 2 हजार 275 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 11 हजार ५४५ पोलीस कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. बरे झालेल्यांमध्ये 1 हजार १६८ पोलीस अधिकारी व 10 हजार ३७७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 42 हजार ६३३ गुन्हे दाखल केले असून क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यात पोलिसांवर ३३८ हल्ले झाले असून याप्रकरणी 891 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 89 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनधिकृत वाहतुकी विरोधात आतापर्यंत 33 हजार 845 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 96 हजार २६ वाहने जप्त केली असून तब्बल 23 कोटी १४ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे