महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळीत इनोव्हा-मोटरसायकल धडकेत दुचाकीस्वारासह दोन जण गंभीर - विक्रोळीत कार-दुचाकीची धडक

विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील कांजूरमार्ग सिग्नल जवळ एका दुचाकी ॲक्टिवाला इनोव्हाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले.

Innova car hit a motorcycle in Vikhroli
दुचाकीस्वारासह दोन जण गंभीर

By

Published : Dec 26, 2020, 8:47 PM IST

मुंबई- विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील कांजूरमार्ग सिग्नल जवळ एका दुचाकी ॲक्टिवाला इनोव्हाने धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले. त्यातील एकाला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व दुसऱ्याला विक्रोळी टागोरनगर येथील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दुचाकीवरील अमित मानकर (वय वर्षे २५) हा युवक त्याच्या मित्राला डबल सीट घेऊन कन्नमवार नगरहून गांधीनगरला उलट्या दिशेने पेट्रोल भरण्यासाठी जात असता पवई मार्गे येणाऱ्या इनोव्हा या चारचाकी गाडीने सिग्नल ओलांडून डावीकडे गाडी घेत असता समोरच दुचाकी येत असणाऱ्या गाडीला धडक दिली. त्यात मोटरसायकल चालकासह एक गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास विक्रोळी पोलिस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details