महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मरीन लाईन्सला बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

मरीन लाईन्स येथे काल (शनिवार) समुद्रात दोन जण बुडाले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह काल बाहेर काढण्यात आला होता. आज दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शहरातील

By

Published : Jul 7, 2019, 3:26 PM IST

मुंबई - मरीन लाईन्स येथे काल (शनिवार) समुद्रात दोन जण बुडाले होते. त्यापैकी एकाचा मृतदेह काल बाहेर काढण्यात आला होता. आज दुसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साहिल रशीद खान (वय 12), जावेद खान (वय २२) अशी मृतांची नावे आहेत.

मरिन लाईन्स येथील समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. काल शनिवार असल्याने मरिन लाईन्सच्या समुद्रकिनारी जास्तच गर्दी होती. समुद्राला असलेल्या लाटांची मजा घेत असताना साहिल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी जावेद खानने पाण्यात उडी मारली. मात्र, समुद्रात मोठ्या लाटा असल्याने दोघेही पाण्यात बुडाले. इतर पर्यटकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आपत्कालीन विभाग अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच काही पाणबुड्यांनाही बोलावण्यात आले. अग्निशमन दल आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने दोघांचाही शोध घेणे सुरू केला होता. यातील जावेद खानचा मृतदेह काल सापडला लागला होता तर आज साहिलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details