महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : साडेचार कोटींचे सोने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त, अंतर्वस्त्रामधून सोन्याची तस्करी

दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना मंगळवार (दि. 17 जानेवारी) रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याकडून 4.54 कोटी रुपये किमतीचे सुमारे 8 किलो वजनाचे सोने पेस्ट स्वरूपात जप्त केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jan 17, 2023, 10:51 PM IST

Updated : Jan 18, 2023, 6:33 AM IST

मुंबई : मुंबई विमानतळावर खळबळजनक घटना समोर आली आहे. येथेदुबईहून आलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. डीआरआयच्या गुप्तचर विभागाने कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडून 4.54 कोटी रुपये किमतीचे सुमारे 8 किलो वजनाचे सोने पेस्ट स्वरूपात जप्त केले आहे. पुढील तपास चालू आहे, अशी माहितीही गुप्तचर विभागाने दिली आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाला(डीआरआय) 17 जानेवारीला दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांकडून पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी होत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि विमानतळावर पथकाने त्यांना अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर पेस्ट स्वरूपात 8.230 किलो सोने सापडले. सोन्याची किंमत सुमारे 4.54 कोटी आहे.

सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवलेजप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडीकेटला आळा घालण्यासाठी डीआरआयचे अधिकारी नियमित कारवाई करतात. अशाच प्रकारे एक अनोखी सोने तस्करीची मोडस ऑपरेंडी उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. देशात सोन्याच्या बेकायदेशीर तस्करीच्या काळ्या धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.


दोन विदेशी महिलांकडून 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त : नुकतेच काही दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) मुंबई युनिटने विमानतळावर 18 कोटी रूपयांचे कोकेन जप्त केले होते. आदिस अबाबाहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळावर रोखण्यात आले होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली होती. मुंबई - आदिस अबाबाहून मुंबईला आलेल्या दोन प्रवाशांना विमानतळावर रोखण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडे ४ हॅण्डबॅगमध्ये कोकेन असलेले ८ प्लास्टिक पाऊच सापडले होते.

१८ कोटींचे कोकेन जप्त केले होते - नुकतेच मुंबई डीआरआयने हे कोकेन जप्तत केले होते. जप्त केलेल्या केलेल्या अंमली पदार्थांचे वजन १,७९४ ग्रॅम आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे १८ कोटी रुपये आहे, असे डीआरआय मुंबईने सांगितले होते.

Last Updated : Jan 18, 2023, 6:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details