मुंबई- पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आणखी दोन कोरोना रुग्ण आढळले आहेत. सद्यास्थितीत पनवेल मनपा क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ५६ इतकी झाली आहे. तर, आज ३ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ७२४ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये २२ जणांचे कोरोना अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यास्थितीत ५६ कोरोनाबाधित रुग्ण पनवेल मनपामध्ये असल्याचे समजले आहे. यामध्ये २४ जण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर २ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कळंबोली येथील ३९ वर्षीय व्यक्ती मुंबई महानगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होती. या व्यक्तीचा आज कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा, असा अंदाज प्राथमिक अहवालात समोर आला आहे. तसेच, नवीन पनवेलमधील एका ५१ वर्षीय आर्मीतून निवृत्त झालेल्या व्यक्तीस एका रुग्णालयामध्ये गेले असता तेथून कोरोनाचे संक्रमण झाले असावे, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर, आज खारघरमधील ३६ वर्षीय, तळोजामधील २७ वर्षीय व्यक्ती व कळंबोलीमधील ६८ वर्षीय महिला असे ३ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचा-बिकेसी, एमएमआरडीए मैदानात उभारले जात आहे 1000 खाटाचे कोविड रुग्णालय