मुंबई- बोरिवली परिसरात इंटरनेट वेबसाईटच्या माध्यमातून वेश्यागमनसाठी महिला पुरविणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने ही कारवाई केली आहे. यात 2 जणांना अटक करण्यात आली असून 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे.
'आॅनलाईन सेक्स रॅकेट'... हेही वाचा-निर्भया प्रकरण : 'तारीख पे तारीख...मात्र, प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाची अपेक्षा कायम'
बोरिवली पूर्व येथील कुलपवाडी येथे इंटरनेटच्या माध्यमातून वेश्याव्यवसायासाठी महिला पुरविल्या जातात, अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी ग्राहक बनून वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी काही महिलांचे फोटो व्हाॅट्सअॅपवर पोलिसांना मिळाले. पोलिसांनी 5 हजार हजारांचा सौदा करुन सुरुवातीला एक हजार रुपये अॅनलाईन पाठवले. त्यानंतर पोलिसांना बोरिवली पूर्व येथील कुलपवाडी, रहेजा इस्टेट येथील पत्ता देण्यात आला.
पोलिसांनी त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी सापळा रचला. यात संतोष नेमधारी साहू (वय 28) व नेमधारी घामन साहू (वय 55) यांना ताब्यात घेण्यात आले. तर 2 महिलांची सुटका करण्यात आली. दरम्यान, त्या दोघांवर ठाणे व पालघर पोलिसात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.